बीजिंग : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. सगळ्यात पहिले चीनमध्ये सापडलेला कोरोना व्हायरस काही महिन्यांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. ३ महिन्यानंतर आता चीनमधली स्थिती सामान्य होत आहे. पण चीनमधल्या संशोधकांनी कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाचं संकट थंडीच्या दिवसात नोव्हेंबरमध्ये पुन्हा निर्माण होऊ शकतं, असा इशारा शांघाईमधल्या कोव्हिड-१९ टीमचे प्रमुख झांग वेंहोंग यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसचं केंद्र असलेल्या वुहानमधला लॉकडाऊन ७६ दिवसांनंतर पूर्णपणे उठवण्यात आला. बुधवारपर्यंत चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ८२,३४१ पर्यंत पोहोचली, तर ३,३४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. 


कोरोनाविषयी बोलताना झांग वेंहोंग म्हणाले की 'अमेरिकेला मे महिन्यापर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येऊ शकतं. पण अमेरिका आणि चीनला सांभाळून राहावं लागेल. प्रमाणापेक्षा जास्त ढील दिला तर कठीण परिस्थिती ओढावू शकते.'