मुंबई : चीनमध्ये सध्या दुःखाचं वातावरण आहे. याला कारण आहे एका अतिशय लोकप्रिय आणि धाडसी डुक्कराचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर एका डुकराला आठवून नागरिक श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या धाडसाचे किस्से सांगितले जात आहेत. अगदी या डुकरामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 'झू जिनक्यिांग' (Zhu Janqiang) नावाच्या डुकराचे वयोमानानुसार निधन झाले आहे. 


सर्वाधिक इच्छाशक्तीवाला डुक्कर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये हे डुक्कर मजबूत इच्छाशक्तीकरता ओळखलं जातं. 2008 मध्ये चीनच्या सिचुआन (Sichuan) मध्ये 7.9 तीव्रतेचा भूकंप आला. यामध्ये जवळपास 90 हजार लोकांचा मृत्यू झाला. तसेच साडे तीन लाख लोकं जखमी झाली. त्या भूकंपातून हे डुक्कर अतिशय सावधपणे बाहेर आलं होतं. 


हे डुक्कर तब्बल 36 दिवस मलब्याच्या खाली गाडलं गेलं होतं. अन्न आणि पाण्याविना जीवंत राहिलेल्या या डुक्कराचं कौतुक होतंय. तो अगदी एका बकरी सारखा दिसत होता. एवढं त्याचं वजन कमी झालं होतं. 


मलब्यात 36 दिवस राहिल्यानंतर हे डुक्कर अतिशय लोकप्रिय झालं होतं. एवढंच नव्हे तर हे डुक्कर इच्छाशक्तीमुळे आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये देखील चर्चेत आलं होतं. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, भूकंपानंतर म्युझियमच्या मालकाने 450 डॉलरला या डुक्कराला खरेदी केलं होतं. 


म्युझिअमने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री या डुक्कराचं वृद्धत्वाने निधन झालं आहे. डुक्कर हे अनेक वर्ष म्युझिअमच्या आकर्षणाचा विषय ठरला.