ग्वांगदोंग : पुन्हा एकदा, चीनमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत, चीनमधील दक्षिणेकडील ग्वांगदोंग राज्यात (Guangdong) कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर चीनने सोमवारपासून पुन्हा निर्बंध लावण्यास सुरवात केली आहे. या राज्याची लोकसंख्या दीड कोटी आहे. त्यामुळे कोरोनालो रोखण्यासाठी चिनी अधिकाऱ्यांनी घोषित केले की, ग्वांगदोंग सोडून जाणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी घेणे बंधनकारक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाँगकाँगच्या सीमेवरील ग्वांगदोंग येथे गेल्या 24 तासांत कोरोना संसर्ग होण्याच्या 20 नवीन घटना समार आल्या आहेत. जगातील इतर देशांपेक्षा ग्वांगदोंगमध्ये संसर्गाची नवीन प्रकरणे कमी आहेत, परंतु चिनी अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क केले आहे. प्रांतीय सरकारने जाहीर केले की, सोमवारी रात्री 10 नंतर विमान, ट्रेन, बस किंवा खाजगी कारने ग्वांगदोंग सोडणाऱ्या लोकांना गेल्या 72 तासांत केलेल्या तपासणीचा रिपोर्ट दाखवावा लागेल.


ते म्हणाले की, मुख्य रस्त्यांवरल ट्रक चालकांसाठी चौक्या बनवल्या जातील. दरम्यान, स्थानिक पातळीवरील संसर्गाची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर 21 मे रोजी ग्वांगझोउ यांनी सामूहिक चौकशीचे आदेश दिले. गेल्या बुधवारपासून सात लाख लोकांचा तपास केले असल्याचे येथील स्थानिक सरकारने म्हटले आहे.


दीड वर्षात चीनमध्ये 91 हजार प्रकरणे नोंदली गेली


देशातील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाने मार्चमध्ये संक्रमण नियंत्रणात असल्याचे जाहीर केले होते, त्यानंतर कोरोनाचे निर्बंध कमी करण्यात आले. परंतु परदेशातून येणार्‍या प्रवाशांना आता ही कोरोना तपासणी करावी लागत आहे.


त्यानंतर शनिवारी गुवांग्झू (ग्वांगदोंग ची राजधानी) येथील रहिवाशांची घरोघरी  टेस्टिंग घेण्यासाठी घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले. त्याच वेळी काही भागातील बाजार आणि बेबी केअर सेंन्टर बंद करण्यात आले. याव्यतिरिक्त, शाळा आणि घरगुती रेस्टॉरंट्स देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.


अधिकृत आकडेवारीनुसार, संसर्गाची 91 हजार 99 प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये 4 हजार 636 लोकांचा मृत्यू झाला आहे.