बीजिंग : Russia Ukraine Conflict : रशिया - युक्रेन वादात आणखी आगीत तेल ओतू नका असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. (Russia Ukraine War) अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांनी युक्रेनबाबत विधान केले होते. स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व याच्या बाजूने कोणती राष्ट्र उभी राहतात, हे पाहूया, असं विधान ब्लिंकन यांनी केले होते. त्यावर चीनने आगीत तेल ओतून वाद वाढवू नका, असा इशारा दिला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी आणि अमेरिकेचे परराष्ट्र ब्लिंकन यांनी फोनवरून शनिवारी चर्चा केली. त्यात चीनने हा इशारा दिला. (China tells US don't fuel flames in Ukraine - Chinese Foreign Minister Wang Yi )


युक्रेनचा दावा, 9 दिवसांत रशियाला असा शिकवला धडा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया- युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) सुरु असल्याने जगातून तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काळी काळासाठी रशियाकडून युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. गेले दहा दिवस रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले चढविण्यात येत आहेत. यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक प्रशासकीय इमारती रशियाकडून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. सगळीकडे ओसाड भाग आणि भयाण शांतता दिसून येत आहे. 



युक्रेनेच्या मदतीसाठी पुढे कोणी सरसावला तर त्यालाही धडा शिकवला जाईल, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिला होता. आता पुन्हा पुतिन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला आहे. त्यांनी पाश्चात्य देशांना इशारा म्हटले आहे की, युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्याचा कोणताही प्रयत्न जगासाठी विनाशकारी ठरेल. आधीच रशियावर पाश्चात्य निर्बंध ही युद्धाची घोषणा होती. आता चीनकडूनही अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे. कोणती राष्ट्रे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या तत्त्वांसाठी उभी आहेत आणि हे जग पाहत आहे. शनिवारी या दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.