नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला चोरीच्या घटनेचा एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्ही या चोरावर नक्कीच हसाल.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका चोराने चोरी करण्यासाठी जबरदस्त प्लान आखला. चोरीसाठी दुकानाची रेकी केली त्यानंतर दुकान बंद होण्याची वाट बघितली. दुकानातील सर्व कर्मचारी निघून जाताच अंधाराचा फायदा घेत चोराने दुकानात प्रवेश केला.


परफेक्ट क्राईम समजत होता तो...


दुकानाच्या काचा तोडल्या. कुणीही या चोराला पकडलं नाही. मात्र, ज्या चोरीला तो परफेक्ट क्राईम समजत होता तोच परफेक्ट प्लान त्याला काही वेळात झटका देणार याचा त्याला अंदाजा नव्हता.


सोनं केलं चोरी मात्र निघालं....


चीनमधील एका चोराने मोठ्या हुशारीने ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्याच्या विटा चोरी केल्या. मात्र, नंतर त्याला कळालं की ज्या सोन्याच्या विटा त्याने चोरी केल्या आहेत त्या नकली आहेत. या नकली विटांची बाजारात काहीही किंमत नाहीये.


ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतलं असून त्या आधारे तपास सुरु आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.



व्हिडिओत मास्क घातलेला चोर हातोड्याने काच तोडताना दिसत आहे. त्यानंतर त्यामध्ये ठेवलेल्या विटा चोरी करतो.