सिक्कीम : चीन आणि भारत यांच्यात सिक्कीमच्या सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या कुरापती वाढताना दिसत आहेत. हिंदी महासागरात चीननं तब्बल १३ युद्ध नौका उतरवल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान याच आठवड्याच्या शेवटी पंतप्रधान मोदी जी 20 देशांच्या बैठकीसाठी जर्मनीत जाणार आहेत. तिथेच मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसात भारत आणि चीन यांच्यातला तणाव टीपेला पोहचला. भारतीय नौदलाच्या उपग्रह गस्त यंत्रणांमध्ये गेल्या दोन महिन्यात चीनच्या हिंदी महासागरातल्या हालाचली वाढल्याचं स्पष्ट दिसतं आहे.  त्यात एक चीनी नौदलाची एक डिस्ट्रॉयर शिप, आणि एक युवान जातीची पाणबुडीही दिसते आहे. हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढवण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय. येत्या १० जुलैला भारत, अमेरिका आणि जपान यांचा एकत्र नौदल युद्धाभ्यास होणार आहे. त्याचाही चीननं चांगलीच दखल घेतल्याचं दिसतं आहे. हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.