बीजिंग : चीन पुढील वर्षी आपल्या शिनजियांग (Xinjiang) प्रांतातील सर्वात महत्वाचे विमानतळ तयार करेल. 10500 फूटांपेक्षा जास्त उंचीवर बांधलेल्या या विमानतळावर चीनने आपले लढाऊ विमान आणि वाहतूक विमान उतरवून त्याची चाचणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी मे महिन्यात चीनने पाकिस्तानला आश्वासन दिले होते की हे विमानतळ एका वर्षात पूर्ण केले जाईल, जे गिलगिट-बाल्टिस्तानमधील भारताच्या कोणत्याही हालचालीचा प्रतिकार करेल. हे विमानतळ पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या अगदी जवळ आहे. येथून चीन केवळ पीओकेवरच नव्हे तर लडाख आणि उत्तर-पश्चिम भारतावरही सहज आक्रमण करू शकतो. यासह पीओकेची अफाट खनिज संपत्ती लुटण्यासाठी चीनलाही हे विमानतळ वापरायचे आहे.


चीन हे विमानतळ ताशकरगन (Tashkurgan) येथे बनवत आहे. जे धोरणात्मक दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. येथून पाकिस्तान सीमा म्हणजेच खुंजेराब केवळ 120 किमी अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे चीनचे प्रमुख विमानतळ काशगर येथून 230 किमी अंतरावर आहे. ताशकरगन हे चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेजवळ आहे आणि चिनी इकोनॉमिक कॉरिडॉर काराकोरम महामार्गावर पडते. 2020 पासून जेव्हा भारताने रेडिओ प्रसारणात गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानविषयक माहिती देशाच्या विविध भागांसह प्रसारित करण्यास सुरूवात केली तेव्हा चीनने पाकिस्तानला प्रोत्साहित करण्यासाठी या एअरपोर्टचे बांधकाम वेगवान केले.


काश्मीर-लेहच्या अगदी जवळ


या विमानतळापासून पीओकेच्या सीमेवर लेह ते फक्त 455 किमी आणि श्रीनगर फक्त 413 कि.मी. अंतरावर आहे, म्हणजे येथून चिनी लढाऊ विमान भारतीय सैन्याच्या कोणत्याही कारवाईला सहज लक्ष्य करू शकते. या उंचीवर कमी हवेच्या घनतेमुळे, लढाऊ विमानाने पूर्ण शस्त्रे घेऊन लांबपर्यंत हल्ले करणे शक्य नाही, म्हणून जवळपास एअरबेस ठेवल्याने हल्ल्याला मदत होते.


इथली हवाई पट्टी 3800 मीटर लांबीची आणि रुंदी 45 मीटर आहे, त्यामुळे मोठी विमानदेखील सहज येथून उतरु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने अलीकडेच आपले सर्वात आधुनिक लढाऊ जे-20 आणि सर्वात मोठे वाहतूक विमान वाय -20 येथे उतरवले होते. हे विमानतळ सध्या झिनजियांगच्या होतान, काश्गर आणि न्यागरी-गुरगुन्सा विमानतळांपेक्षा भारताच्या अगदी जवळ आहे.


फक्त 50000 लोकसंख्या असलेले ताशकरगन हे एक लहान शहर आहे. पीओकेच्या अगदी जवळ असल्याने, चीन त्याला मोठं सैन्य तळ म्हणून विकसित करीत आहे. यामागील चीनचा हेतू म्हणजे पीओकेमध्ये भारताकडून कोणतीही कारवाई होण्याची शक्यता ओळखणे, याशिवाय अफाट खनिज संपत्ती लुटणे.


पीओकेच्या संपत्तीवर लक्ष 


सोने, युरेनियम व्यतिरिक्त पीओकेच्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये मॉलीबडेनमचा साठा आहे. मालिडेनम एक दुर्मिळ खनिज आहे ज्याचा वापर टाकी तसेच अंतराळ विज्ञानासाठी अत्यंत मजबूत स्टील बनविण्यासाठी केला जातो. पीओकेच्या हुंझा नगरमध्येही युरेनियमचा साठा आहे. पाकिस्तानने येथील सुमारे 2000 चीनी कंपन्यांना खाणात उत्खनानासाठी भाडेत्त्वावर दिले आहे.