Interviews For Chinese Firm : उच्च शिक्षित बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जॉब मिळवणे अत्यंत कठीण आहे. अनेक कंपन्याची interview प्रोसेस अत्यंत कठीण आहे. यामुळेच अगदी फस्ट क्लासची डिग्री असली तरी फक्त interview मध्ये अपयशी झाल्याने अनेकांना जॉब मिळत नाहीत. तर अनेकांना हुशारी आणि व्यक्तीमत्वाच्या जोरावर जॉब मिळतो. मात्र, चीनमध्ये  एक कंपनी अशी आहे जिथे  जॉबसाठी interview देणारा आणि interview  घेणारा दोघेही घालतात मास्क घालतात. मास्क घालून  interview घेतला जाते. यामागे अतिशय रंजक कारण आहे (applicants wear a costume mask in interviews for Chinese firm). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कंपनी चीनमधील आहे. या कंपनीत जॉबसाठी मुलाखती सुरु होत्या. या मुलाखतींसाठी अनेक उमेदवार हे कुत्रा, मांजर अशा विविध प्रकारचे मास्क घालून आले होते. विशेष म्हणजे या उमेदवारांची मुलाखत घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील चित्र विचित्र मास्क घातले होते. 


या कंपनीचे नाव चेंगडू अँट लॉजिस्टिक्स असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीत विविध रिक्त पद भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी उमेदवार वेगवेगल्या प्रकारचे मास्क घालुन मुलाखतीसाठी आले होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कंपनीत होत असलेली ही अजब interview प्रोसेस चर्चेत आली आहे. 


मीडिया ऑपरेटर, लाइव्ह-स्ट्रीम ब्रॉडकास्टर आणि डेटा विश्लेषक या पदासांठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचे चेहरे पूर्णपणे मास्कने झाकलेले होते.  एवढेच नाही तर उमेदवारांच्या मुलाखती घेणाऱ्यांनीही मास्क घातले होते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबतचे वृत्त दिले. या अनोख्या मुलाखतीचा व्हिडिओ चिनी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.


कंपनीने का घेतल्या मास्क घालून मुलाखती


येथे मुलाखतीसाठी आलेल्या आणि घेणाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मास्क घातले होते. कुणी कुत्रा, मांजर अशा विविध प्राण्यांचे तर कुणी एलीयन्सासरखे दिसणारे मास्क घातले होते. नोकरीसाठी ड्रेसिंग सेन्स किंवा चांगले दिसणे आवश्यक नाही, तर पात्रता असणे अधिक महत्त्वाचे आहे असं कारण या कंपनीने सांगितले आहे. बऱ्याचदा उमेदवाराची पर्सनालिटी,  त्याचा आत्मविश्वास अशा गोष्टू पाहून त्यांना नोकरीवर ठेवले जाते. म्हणूनच कंपनीने मास्क घालून मुलाखती घेतल्या आहेत. कोण कसे दिसते याकडे लक्ष देत नाही, त्यांचा अर्थ इतकाच आहे की कोण सक्षम आहे, कोण चांगले काम करू शकते हे जास्त महत्वाच असल्याचे कंपनीचं म्हणण आहे. अनेकांनी कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.  बहुतेक कंपन्या सुंदर दिसणाऱ्या मुलींना कामावर घेतात आणि सक्षम उमेदवारांना डावलले जाते. प्रत्येक कंपनीने ही पद्धत अवलंबली पाहिजे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.