Chinese Company Tencent: चीनी समूह टेसेंट या कंपीनीने जून तिमाहीत $19.8 अब्ज महसूल पोस्ट केल्यानंतर 5 हजार 500 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, चीनमधील सर्वात मोठ्या व्हिडिओ गेमिंग आणि सोशल मीडिया कंपनीने दुसऱ्या तिमाहीत सुमारे 5,500 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं.  (chinese conglomerate tencent laid off 5500 employees after posting revenue of $19 8 billion in June quarter) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीनुसार, टेसेंटने 2014 नंतर प्रथमच नोकरकपात केली आहे. जूनच्या अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या ही 110,715 इतकी झाली आहे. जी आकडेवारी मार्चमध्ये 116,213 इतकी होती. 


टेनसेंटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पोनी मा हुआतेंग म्हणाले, “दुसऱ्या तिमाहीत आम्ही सक्रियपणे नॉन-कोर व्यवसायांमधून बाहेर पडलो.  मार्केटिंग आणि ऑपरेटिंग खर्च कमी केला. यामुळे आम्हाला आमच्या गैर-आयएफआरएस कमाई वाढण्यास मदत झाली. 


या कालावधीत निव्वळ उत्पन्न 18 अब्ज युआनवर पोहोचले आहे.  जे एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 56 टक्क्यांनी कमी आहे.चीनमधील सर्वात मोठ्या खाद्य वितरण कंपन्यांपैकी एक असलेल्या Meituan मधील काही किंवा सर्व 17 टक्के भागभांडवल Tencent विकण्याचा विचार करत असल्याचंही अहवाल समोर आला आहे.


दरम्यान, कंपनीने बुधवारी अर्निंग कॉलदरम्यान या वृत्ताचं खंडन केलं. देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर व्हीडिओ गेमिंगच्या विक्रीत घट झाली आहे.