नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झडप झाल्याची माहिती पुढे आली आहे. भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये ही झडप झाली. ईस्टर्न लडाखच्या पँगोंग झील भागात दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये 29-30 ऑगस्टच्या रात्री ही झडप झाल्याचं कळत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु असताना पुन्हा एकदा झडप झाल्याचं समोर आले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यानंतर भारतीय सैन्य पुन्हा अलर्टवर आहे. चीन एकीकडे शांततेचा नाटक करत आहे आणि दुसरीकडे सैन्य घुसखोरी करत आहे. चीनी सैनिकांच्या घुसखोरीला यावेळी भारतीय सैन्याने जोरदार उत्तर दिलं.



संरक्षण मत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 'चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांनी उकसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी देखील त्याला उत्तर दिलं. भारतीय सैन्य शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. चर्चेतून वाद संपवला जावू शकतो. पण तरी देखील आम्ही आमच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.' 



गलवान खोऱ्यात 15-16 जून रोजी रात्री भारतीय सैन्य आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली होती. ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. या झडपमध्ये चीनचे 43 सैनिक मारले गेले होते.