कराची : तालिबान्यांनी अफगाणिस्तानात दहशत माजवली आहे. तालिबानी एकामागे एक अशा प्रकारे दहशतीच्या जोरावर शहरांवर ताबा मिळवत आहे. अफगाणि नागरिकांना या अशा परिस्थितीमुळे घराबाहेर पडता येत नाही. जीवे मारले जाऊ, या भितीने घरातूनही कोणीही बाहेर पडत नाहीये. खाण्यापिण्याची आबाळ झाली आहे. आपल्याच देशात तालिबान्यांनी मांडलेल्या उच्छादाला वैतागून नाईलाज म्हणून हे नागरिक जीव वाचवण्यासाठी चमन बॉर्डरमधून पाकिस्तानमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र या  शरणार्थींना पाहून पाकिस्तानलाही पाझर फुटला नाही. या शरणार्थींवर पाकिस्तानकडून गोलीबार करण्यात आला. तालिबानने ही चेक पोस्ट आपल्या ताब्यात घेतल्यापासून बंद ठेवली आहे. आधी या सीमेवरुन हजारो लोक अफगाणिस्तानातील स्पिन बोल्डक इथून पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये ये जा करायचे. (clashes during to pakistans security forces and afghans on chaman border)
 
चमन सीमेवर हिंसाचार का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबान सीमा बंद केल्यामुळे शेकडो अफगाणी पाकिस्तानच्या बाजूने अडकल्याचे सांगितले जात आहे. हे लोक तालिबानसोबतची सीमा खुली करून त्यांच्या देशात जाण्याची पाकिस्तान सरकारकडे मागणी करत आहेत. दरम्यान, तिथे धुळ असल्याने तसेच उष्ण हवामान आहे. त्यामुळे दुपारी 56 वर्षीय अफगाण प्रवाशाचा  हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 
 
सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये चकमक


रिपोर्टनुसार, आंदोलकांनी त्यांचा मृतदेह पाकिस्तानी सरकारी कार्यालयात नेऊन सीमा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. काहींनी सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. प्रत्युत्तरादाखल अश्रूधुराच्या गोळ्या झाडल्या आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. दरम्यान यामध्ये कोणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही.  


तालिबानने सीमा का बंद केली?


अफगाण नागरिकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानात प्रवेश करू द्यावा, अशी तालिबानची मागणी आहे.  पण, पाकिस्तान सरकार या मागणीच्या विरोधात आहे. त्यामुळे तालिबानने ही सीमा सील केली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवर कब्जा करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यासमोर तालिबानी दहशतवादी बसले आहेत.