Shocking Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे यूजर्सचे लक्ष वेधतात. आज असाच एक व्हिडीओने हजारो यूजर्सचे लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमधील दृष्य जेवढं अद्भूत आहे तेवढचं ते भीतीदायक पण आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. हा व्हिडीओ म्हणजे निसर्गाचं चमत्कार म्हणायला हवं. ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे त्याचं पण सोशल मीडियावर खूप कौतुक होतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, हा एक टाइम लॅप्स व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये पर्वतांनी वेढलेला एक सुंदर असा तलाव आहे. या तलाववरून एक ढग फिरताना आपण पाहू शकतो. हळूहळू ढग पुढे सरकतात आणि अचानक पाऊस पडायला लागतो. पर्वतांमधून जेव्हा हे ढग तलावावर येतात अजून काही बॉम्बस्फोट व्हावा तसं हा ढग फुटतो. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं जसं की, एखादी पाण्याने भरलेली बादली उलटी केली आणि धोधो पाणी खाली कोसळलं. हे दृष्य पाहून क्षणभरासाठी घाबरायला होतं. पण निसर्गाचं हे अद्भूत रुप पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा व्हिडीओ म्हणजे हवामानशास्त्र आणि लँडस्केपचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. 


हा व्हिडीओ दक्षिण ऑस्ट्रियाचा असून हा व्हिडीओ पीटर मायरने यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. ज्या तलावावर ही ढगफुटी होते त्या तलावाचं नाव Lake Millstatt आहे. 2018 मधील हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. पीटरने हा व्हिडीओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओला 2 कोटींपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत.