आंघोळीसाठी महिला बाथरुममध्ये गेली खरी, पण समोरच होता विषारी किंग कोब्रा... पाहा पुढे काय झालं
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयाचा ठोकाच चुकेल.
थायलंड : आजकाल सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात. कधी लहान मुलांची फजिती तर कधी प्राण्यांचे विविध व्हिडिओ. नुकतंच असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धडकी भरेल. हा व्हिडीओ मुळचा थायलंडचा आहे. या व्हीडिओमध्ये एक कोबरा साप बाथरूपमध्ये लपलेला दिसतोय. थायलंडचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयाचा ठोकाच चुकेल.
काय आहे या व्हिडीओमध्ये
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक मोठं बाथरूम आहे आणि बाथरूमच्या कोपऱ्यात एक साप लपलाय. यामध्ये एक महिला अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये जाते. यावेळी बाथरूममध्ये गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की, बाथरूममध्ये एक साप आहे.
मुख्य म्हणजे जेव्हा ही महिला बाथरूममध्ये अंघोळीला जाते त्यावेळी तिला साप लपलेला असल्याची कल्पना नसते. दरम्यान हा साप साधा नसून धोकादायक कोब्रा साप असतो. जेव्हा हा कोब्रा साप असल्याचं लक्षात येतं तेव्हा तिची चांगलीच तारांबळ उडाते.
सापाचा व्हिडीओ व्हायरल
साप असल्याचं समजताच महिला लगेचच बाथरूमच्या बाहेर येते आणि घरातील सदस्यांना याबद्दल सांगते. त्यानंतर ही महिला सर्प मित्राला बोलवते आणि त्या सापाला पकडण्यासाठी सांगते. सुदैव म्हणजे या घटनेमध्ये हा कोब्रा साप कोणालाही चावत नाही. या सापाला पकडण्यासाठी सर्प मित्रालाही चांगलीच तारेवरची कसरत करावी लागलीये.