Man inhales cockroach in sleep : शांत झोप हे प्रत्येकाला हवी असते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे याची अनेक वेळा आपल्या कल्पनाही नसते. गाढ झोपेत असताना आपल्यासोबत काही दुर्घटना घडू शकते. झोपते असताना हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचं जीव गेल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. अशी एक भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. (cockroach entered the throat from the nose while breathing in sleep chinese man Viral News in marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्यक्ती गाढ झोपेत असताना त्याच्यासोबत जे काही घडलं त्याची कोणीही कल्पनाही करु शकणार नाही. झोपेत श्वास घेताना एक झुरळ त्याचा नाकपुड्यात घुसलं. त्यानंतर ते हळूहळू आता जात राहिलं. त्या व्यक्तीला या सगळ्याची काही कल्पना नाही.


मात्र सकाळी झोपेतून उठल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला घशातून काहीतरी सरकत असल्याची जाणीव झाली. मात्र नेमकं काय होतं त्याला कळतं नव्हतं. त्याने या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं. तिन दिवसांनी त्याच्या श्वासातून घाणेरडा वास येऊ लागला आणि त्याला खोकलाही येत होता. पुढे त्याला खोकल्यानंतर पिवळ्या रंगाचा कफ बाहेर पडत होता. 


आता त्याने डॉक्टरांकडे जाण्याच ठरवलं. तो ईएनटी (नाक, कान, घसा) तज्ज्ञांकडे गेला. डॉक्टरांना प्राथमिक तपासणीत फार काही विशेष जाणवलं नाही. पण या व्यक्तीचा त्रास वाढत होता. आता त्याने श्वसनाशी संबंधित तज्ज्ञाकडे जाणाचा ठरवलं. त्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी सर्वप्रथम छातीचा सीटी स्कॅन काढला. 



त्या त्यांना या व्यक्तीच्या छातीच्या उजल्या बाजूला काळसर डाग दिसून आला. यावरु त्यांना कळलं की त्याचा शरीरात काहीतरी वस्तू अकडली आहे. डॉक्टरांनी ब्राँकोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. 


एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत डॉ. लीन यांनी सांगितलं की, दुसऱ्या दिवशी त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा त्याचा श्वसन नलिकेत पंखासारखी एक गोष्ट दिसून आली. त्याशिवाय जेव्हा श्वसन नलिकेतील जमलेला कफ बाहेर काढल्यानंतर ती गोष्ट बाहेर आली हे पाहून आम्हाला धक्काच बसला. 



त्या व्यक्तीच्या शरीरात झुरळ अडकला होता. या शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीला आराम मिळालाय. ही घटना चीनमधील हेनान प्रांतात राहणाऱ्या 58 वर्षीय हायकोसोबत घडली होती.