डिलिव्हरी एंजटने बलात्कार करत हत्येचा प्रयत्न केला; 18 वर्षीय तरुणीचा आरोप, कंपनी म्हणते `ही आमची समस्या नाही`
डोअरडॅश डिलिव्हरी (Doordash Delivery) एजंटने आपल्यावर बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 18 वर्षीय तरुणीने केला आहे. यानंतर कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याआधी त्यांची पार्श्वभूमी योग्यरित्या तपासली जात नसल्याचा आरोप करत कंपनीविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
डोअरडॅश डिलिव्हरी (Doordash Delivery) एजंटने आपल्यावर बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 18 वर्षीय तरुणीने केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्लोई असं या मुलीचं नाव असून आपण तक्रार करुनही कंपनीने काही कारवाई नसल्याचा तिचा दावा आहे. 12 फेब्रुवारी 2022 रोजी मुलीने आपल्या रुममेटसह मॅकडोनाल्डमधून ऑर्डर दिली होती. पण यानंतर जे काही होणार आहे त्याची तिला कल्पना नव्हती. यंग असं डिलिव्हरी एजंटचं नाव आहे. दरम्यान डिलिव्हरी केल्यानंतर काही वेळ तो त्यांच्याशी गप्पा मारत तिथेच उभा होता. अमेरिकेत हा सर्व प्रकार घडला आहे.
Business Insider ने दिलेल्या वृत्तानुसार, यंग हा इतरांप्रमाणे एक डिलिव्हरी एजंट होता. त्याने ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर काही वेळ मुलींशी गप्पा मारल्या आणि निघून गेला. पण यानंतर चार दिवसांनी चोलेच्या आयुष्यात उलथापालथ झाली. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास यंग हा अनपेक्षितपणे तिच्या दरवाजार आला आणि शेजाऱ्यांची चौकशी करु लागला. क्लोईने यावेळी काळजीपूर्वक दरवाजा उघडला.
पोलीस रेकॉर्डमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, यानंतर धक्कादायक घटना घडल्या. यंगने घरात प्रवेश केला आणि तिला दुखापत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये संघर्षही झाला. ज्यामध्ये क्लोईला गंभीर जखमा झाल्या. तिचं नाक मोडलं तसंच बोटांवर आणि मानेवर जखमा झाल्या. आरोपी तरुणाने तिचा सगळा दाबण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तपास केला असता यंग याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं. 2016 मध्ये हिट अँड रन प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. जेलमध्ये शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर डोअरडॅशने त्याला कामावर नियुक्त केलं होतं. धक्कादायक म्हणजे, क्लोईने तक्रार केल्यानंतरही कंपनीने कारवाई केली नाही.
यानंतर क्लोईने डोअरडॅशिवरोधात खटला दाखल केला असून, डिलिव्हरी एजंट म्हणून यंगला कामावर ठेवण्यापूर्वी त्यांच्याकडून निष्काळजीपणाचा आरोप केला गेला.
क्लोईचे वकील शॉर्टवे यांनी लक्षात आणून दिलं की, डोअरडॅशने त्यांच्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी Checkr या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. Checkr कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करते. दरम्यान, या घटनेचा उल्लेख करत शॉर्टवे यांनी कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्याचे महत्त्व अधोरेखित केलं. विशेषत: जेव्हा व्यक्तींचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असतात तेव्हा त्यावर उपाय शोधला पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
या प्रकरणामुळे डोअरडॅशसारख्या कंपन्यांच्या त्यांच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कंपन्या त्यांच्या कामगारांच्या योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसह संगणक प्रणाली वापरतात. तथापि, Doordash ला डिलिव्हरी एजंटची गुन्हेगारी इतिहासाची पूर्व माहिती होती की चेकरची प्रणाली घटनेत बिघडली होती हे समजू शकलेलं नाही.