तुलना भारत, इस्त्रायल, चीन आणि पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची...
इस्त्रायल पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या भारतभेटीमुळे सर्वाचं लक्ष इस्त्रायलकडे लागलं आहे.
नवी दिल्ली : इस्त्रायल पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या भारतभेटीमुळे सर्वाचं लक्ष इस्त्रायलकडे लागलं आहे.
चीन आणि पाकिस्तानची डोकेदुखी
आपल्या आक्रमक भूमिकेसाठी इस्त्रायल जगभरात ओळखला जातो. इस्त्रायलच्या लष्करी ताकदीबद्दलही अनेकदा बोललं जातं. त्यातच सध्या भारत - पाकिस्तान सीमेवर वातावरण तंग आहे. चीनबरोबरचा डोकलामचा वाद नुकताच कुठे निपटू पाहतोय. चीन पाकिस्तान युती ही भारताची सगऴ्यात मोठी डोकेदुखी आहे. हे दोन्ही देश भारताचे सर्वात मोठे शत्रू आहेत.
भारत-इस्त्रायल युती
भारतीय सैन्या आपल्या शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. तरीही डावपेचाच्या दृष्टीने इस्त्रायल महत्व मोठं आहे.
यामुळेच इस्त्रायलची मैत्री भारताला हवीहवीशी वाटते.
पाकिस्तानसारखा आडमुठा देशही इस्त्रायलच्या आक्रमक बाण्याला वचकून असतो. लष्करीदृष्ट्या भारत-इस्त्रायल युतीचं महत्व प्रचंड आहे.
भारत, इस्त्रायल, पाकिस्तान आणि चीनची लष्करी तुलना त्यामुळेच मोठा कुतुहलाचा विषय असते.
चारही देशांच्या महत्वाच्या लष्करी अंगाची केलेली ही तुलना,
सैन्यसंख्या तोफखाना हवाई दल नौदल
(कृतीशील) (लढाऊ विमानं) (लढाऊ जहाजं)
भारत 21,40,000 5067 2216 295
इस्त्रायल 1,76,500 1,522 789 74
पाकिस्तान 6,43,800 3,827 1380 197
चीन 23,00,000 9,726 3729 749