धड एक पण चेहरे दोन; एकमेकींना जोडलेल्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत केले लग्न, VIDEO
Conjoined Twins Marriage: एकमेकांना जोडले गेलेल्या दोन बहिणींने एका मुलाशी लग्न केले आहे.
Conjoined Twins Marriage: जन्मतःच एकमेकींना जोडल्या गेलेल्या दोन बहिणींनी एकाच मुलीशी लग्न केले आहे. या दोन बहिणींचे नाव एबी हेंसल आणि ब्रिटनी हेंसल असं आहे. या दोन बहिणींपैकी डाव्या बाजूला चेहरा असलेल्या एबीने माजी सैनिक व नर्स जोश बाउलिंगला तिचा जीवनसाथी म्हणून निवडले आहे. खरं तर 2021 सालीच त्यांचे लग्न झाले होते. मात्र. त्याचा खुलासा आत्ताच जगासमोर करण्यात आला आहे. या लग्नामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
34 वर्षांच्या या दोन बहिणी एबी आणि ब्रिटनी यांनी 1996 साली ओपरा विन्फ्रे यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. त्यानंतर त्यांची टीएलसी रिअॅलिटी सिरीजदेखील आली होती. या माध्यमातून त्यांनी त्यांचे रोजच्या आयुष्य कसं जगतात हे लोकांपर्यंत पोहोचवले होते. एबी हेंसलने तिचे फेसबुक प्रोफाइल फोटो बदलला आहे. ती तिचे हे अकाउंट बहिण ब्रिटनीसोबत शेअर करते. सध्या तिच्या प्रोफाईल फोटो हा एका लग्न समारंभातील वाटतो. यात या बहिणींनी लग्नातला गाऊन परिधान केला आहे. तर, नवरदेव बाउलिंगने ग्रे रंगाचा सूट घातला आहे. फोटोत दोघंही एकमेकांचा हात पकडून एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. तसंच, एक छोटा व्हिडिओदेखील शेअर करण्यात आला आहे. यात हे जोडपं लग्नात डान्स करताना दिसत आहे.
एका रिपोर्टनुसार, दोघी बहिणी अमेरिकेतील मिनेसोटामध्ये मुलांना शिकवतात. ते तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. डेली मेलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यात ती मुलांना शिकवताना दिसत आहे. व्हिडिओला कॅप्शनदेखील देण्यात आले आहे. एकमेकांना जोडल्या गेलेल्या बहिणी एबी आणि ब्रिटनी रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहेत. त्या क्लासमधील मुलांना शिकवत आहेत. जुळ्या मुलींपैकी एकीने आता लग्न केले आहे. तिने तिचा प्रियकर जोश बाउलिंगसोबत लग्नगाठ बांधली आहे.
एबी आणि ब्रिटनी डाइसफॅलमुळं त्या एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. कंबरेखालचे सर्व अवयव एक आहेत. तर एबी उजवा हात व पाय नियंत्रीत करु शकते व ब्रिटनी डाव्या बाजूचा हात-पाय नियंत्रित करतात. 1990 साली जन्मलेल्या या बहिणींचे आई-वडिल माइक हेंसल आहेत. दोघींचा जन्म झाल्यानंतर त्यांना वेगळं करणारी शस्त्रक्रिया करण्यास त्यांच्या पालकांनी नकार दिला होता. कारण, या जर ही शस्त्रक्रिया झाली असती तर दोघांचीही जगण्याची आशा खूप कमी होती.