Athos Salomé prediction about 2024 : आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) टेक्नॉलॉजीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याशिवाय AI मुळे प्रायव्हसी देखील धोक्यात आली आहे. डीफेक फोटो आणि व्हिडिओ यांचा गैरवापर दिसवेंदिवस वाढत चालला आहे यामुळे अनेकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. यानंतर आता AI च्या भविष्यातील वापराबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे.  AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी  साधला जाऊ शकतो असा खळबळजनक दावा जिवंत नास्त्रेदमसने (Athos Salomé) केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एथोस सालोमे असे या जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचे नाव आहे.  37 वर्षीय  एथोस सालोमे (Athos Salomé) ब्राझील देशचाा रहिवासी आहे. तो स्वत:ला 'द लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस' म्हणतो. एथोस सालोमे हा स्वयंघोषित मानसशास्त्रज्ञ आहे. त्याने  काही भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या भयावह आहेत. 2024 या वर्षात AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी संपर्क साधला जाऊ शकतो असा दावा एथोस सालोमे याने केला आहे.


अनेक वैज्ञानिक कल्पना या सध्या मानवाच्या दैंनदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. मात्र, AI तंत्रज्ञान हे या दैनंदिन कल्पनांच्या पलीकडे आहे.  AI तंत्रज्ञानाच्या मदतीने आता अध्यात्मिक मार्गाने देखील वाटताल केली जाणार आहे. जगभरात अनेक लोक मृत आत्म्यांशी संपर्क साधल्याचा दावा करतात. आता  AI तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तींशी संपर्क साधला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जगभरात अनेक गुप्त प्रयोग केले जात आहेत. आध्यात्माच्या मार्गाने जाणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांची यासाठी मदत घेतली जात आहे. मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते. या विश्वास एक अदृष्य एनर्जी कार्यरत आहे.  AI तंत्रज्ञानाच्या मदतीने या अदृष्य शक्तीचा शोध घेवून मृत व्यक्तींशी संपर्क साधला जाऊ शकतो असा दावा एथोस सालोमे याने केला आहे. 


एथोस सालोमेचे अनेक दानवे ठरलेत खरे


एथोस सालोमे अनेक दावे खरेही ठरले आहेत.  राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूपासून ते इलॉन मस्कच्या ट्विटरवरील खंडणीपर्यंत अनेक दावे एथोस सालोमे  यानी 2023 या वर्षासाठी केले होते. हे दावे जवळपास खरे ठरले आहेत. 2023 या वर्षाच्या शेवटी मोठा विनाश होणार आहे. मानवाला मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागू शकतो. प्रलयकारी पूर आणि विनाशकारी भूकंप येवू शकतो असे भाकित एथोस सालोमे याने केले आहे.या विनाशकाही घटनांचे फक्त भाकितच नाही तर या घटना कुठे घडणार याचे लोकेशन देखील एथोस सालोमे  याने सांगितलेय.