Container Ship Ever Given Stuck in Suez Canal: इजिप्तमधील सुएझ कालव्यात गेल्या काही दिवसांपासून एव्हरग्रीन नावाचे महाकाय जहाज अडकले होते. त्यामुळे आशियामधून युरोप आणि आखाती देशांमध्ये जाणाऱ्या व्यापारी जहाजांचे दळणवळण थांबले होते. 
 
 गेल्या मंगळवारपासून सुएझ कालव्यात अडकलेल्या या जहाजाला काढण्यात काही अंशी यश आले आहे. जहाज सुरू करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे. कालव्याचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनी ही माहिती दिली आहे.


दिवसाला करोडो रुपयांचे नुकसान


एव्हरग्रीन जहाजाला काढण्यात टगबोटची मदत होत आहे. पुन्हा या जहाजाला पाण्यात आणण्यात सुएझ कालवा प्राधिकरणाला यश आले आहे. 
परंतु व्यापारी जहांजांचे दळणवळण अद्यापही सुरू झालेले नाही. 
 
या कालव्यातून दिवसाला 50 पेक्षा जास्त जहाजांचे येणे - जाणे होते. कालव्यात जहाज अडकल्याने अनेक जहाजांनी अफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा मारून युरोपची वाट धरली आहे. 
 
महाकाय जहाज अडकल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.  नाशिक आणि अन्य ठिकाणची युरोपात जात असलेले फळांचे कंन्टेनर अनेक दिवसांपासून तिथेच उभे आहेत. त्यामुळे फळांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.