पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात अडकले
पुन्हा भारतात कसं परतायचं याची चिंता त्यांना जाणवतेय.
इंडोनेशिया : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा रद्द झाल्याने हे पर्यटक अडकून पडले आहेत. या पर्यटकांमध्ये नाहुर इथले दिनेश पानसरे, किशोरी कडवे हे दाम्पत्य अडकलंय. १३ ते २० मार्च या कालावधीत त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. ते सगळे पर्यटक सुखरुप असून त्यापैकी कोणीही आजारी नसलं तरी पुन्हा भारतात कसं परतायचं याची चिंता त्यांना जाणवतेय.
मुंबई, जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर आदी राज्यांमधून पर्यटक तेथे गेले होते. या पर्यटकांपैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेल ग्रँडमस प्लसमध्ये वास्तव्याला असून अन्य काहीजण वेगवगेळया हॉटेलांमध्ये आहेत.
पण आता त्यांच्याजवळील राखीव ठेवलेला पैसे संपत आले आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी किती दिवस तेथे रहायचे ? ही चिंता त्या सगळयांसमोर असून ते तणावाखाली आहेत. अडककेल्या सर्व पर्यटकांना सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने साऱ्यांची झोप उडवली आहेत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू मुखी पडलेल्यांची संख्या २२ हजार २९५ झाली. तर कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा हा ४ लाख ९५ हजार इतका झालाय. तर कोरोनाची लागण झालेले १ लाख १९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.
देशातला कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. गेल्या २४ तासात जवळपास ८८ कोरोनाचे रुग्ण देशभरात आढळले. तर कोरोना पॉझिटीव्ह असलेले रुग्ण ६९४ झालीय. आतापर्यंत १६ जणांचा बळी कोरोना व्हायरसने घेतलाय. गेल्या २४ तासात सहा जणांचा मृत्यू झालाय.