मुंबई : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अशा परिस्थितीमध्ये चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये कोरोनाचा व्हायरस आढळून आला आहे. त्यामुळे इथले सुपरमार्केट तातडीनं बंद करण्यात आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा प्रसार जिथून झाला, त्याच चीनमधून आता आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोना व्हायरस आढळल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक प्रशासनानं चीनच्या झेजियांग आणि जियांग्शी प्रांतातल्या नऊ शहरातील विक्रेत्यांजवळची फळं तपासून पाहिली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. 



या भागातील बहुतांश सुपरमार्केट्स बंद करण्यात आली. फळ विक्रेत्यांना क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले. चीन मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममधून ड्रॅगन फ्रूटची आयात करतो. मात्र कोरोनामुळे 26 जानेवारीपर्यंत ड्रॅगन फ्रूटची आयात बंद करण्यात आलीय. फळांमध्ये व्हायरस सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे भारताची चिंताही वाढली आहे.


चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं शिआन आणि युझू शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आलाय. तसंच परदेशातून येणा-या खाद्यपदार्थांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. तुर्तास भारतात तरी फळांमध्ये कोरोनाचा व्हायरस आढळून आलेला नाही. तरी सावध तो सुखी या म्हणीप्रमाणे प्रत्येकानं सतर्क राहणं गरजेचं आहे.