वॉशिंग्टन : कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने (Corona Patients) जगभर हैदोस घातला आहे. या ओमायक्रॉनमुळे (Omicrone) विविध देशात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशातील विविध राज्यांमध्येही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यातच दुसऱ्या बाजूला कोरोनाही वेगाने वाढतोय. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. कॅलिफोर्नियात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. कॅलिफॉर्नियातील कोरोना रुग्णसंख्या ही 50 लाख पार गेली आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. (corona patients in California is more than 5 million and more than 75 thousand deaths)
  
रुग्णांचा आकडा किती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्नियाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण हा 25 जानेवारी 2020 रोजी सापडला होता. यानंतर  292 दिवसांनंतर 11 नोव्हेंबर 2020 ला  कॅलिफॉर्नियातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 10 लाखांवर पोहचला.


यानंतरच्या पुढील 44 दिवसांनी कोरोना बाधितांचा आकड्यात लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. 11 नोव्हेंबर 2020 नंतर पुढील 44 दिवसांनी आकडा हा 20 लाखांच्या पार गेला. तर कोरोनामुळे आतापर्यंत 75 हजार 500 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  


कॅलिफॉर्नियाचा हाय रिस्क झोनमध्ये समावेश


अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने कॅलिफॉर्नियासह देशातील अन्य भागांचा हा  हाय रिस्क झोनमध्ये समावेश केला आहे. या दरम्यान राज्यात कोरोना बाधित रुग्णांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.   


राज्यात गेल्या 7 दिवसांमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान 4 हजार 401 जण रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान यापैकी किती जणांना ओमायक्रॉनची बाधा आहे, हे अजूनही स्पष्ट नाही.