Omicron New Variant: देशात कोरोनाचा (Corona) आलेख कमी झाला असला तरी तो अजून पूर्णपणे संपलेला नाही. अशातच आता कोविडच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या नवीन उप-प्रकाराने चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. Omicron चा sub-variant BA.4.6 चा अमेरिकेमध्ये वेगाने पसरत आहे. अमेरिका हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने (UKHSA) दिलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्टपासून आढळलेल्या काही रुग्णांमध्ये  BA.4.6 विषाणू आढळून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेसह अनेक देशांमध्ये धोका
अमेरिकेच्या सेंटर्स फॉर जिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने केलेल्या दाव्यानुसार BA.4.6 विषाणू अमेरिकेत 9 टक्के रुग्णांमध्ये आढळून आला आहे. इतकंच नाही तर अमेरिकेशिवाय जगभरातील अनेक देशांमध्येही या विषाणूचा प्रादुर्भव झाल्याची माहिती आहे. BA.4.6 हे Omicron च्या BA.4 या उप-प्रकारपैकीच एक आहे. BA.4 पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत जानेवारी 2022 मध्ये आढळून आला आणि तेव्हापासून तो BA.5 प्रकार म्हणून जगभरात पसरला आहे.


या विषाणूचा धोका किती?
BA.4.6 चा प्रादुर्भाव कसा झाला याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. जेव्हा दोन भिन्न प्रकारचे SARS-CoV-2 (COVID-19 ला कारणीभूत विषाणू) एकाच वेळी एकाच व्यक्तीला संक्रमित करतात तेव्हा पुनर्संयोजन होतं.  BA.4.6 हा सब व्हेरिएंट BA.4 सारखाच असण्याची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असं असलं तरी हा विषाणूची फारशी गंभीर लक्षणं समोर आलेली नाहीत.


नव्या विषाणूवर लस किती प्रभावी?
ओमायक्रॉनच्या आधीच्य सब व्हेरिएंटपेक्षा नव्या सब व्हेरिअंटच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठने जाहीर केलेल्या अहवालात फायझर लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये BA.4.6 च्या तुलनेत कमी अँटिबॉडिज निर्माण करतात. म्हणजेच कोविड लस BA.4.6 विरुद्ध कमी प्रभावी ठरू शकते. ही चिंताजनक बाब आहे. 


बूस्टर डोसची घेण्याची गरज
अशा परिस्थितीत, लसीकरण गांभीर्याने घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की लसीकरणामुळे गंभीर आजारांपासून अधित संरक्षण मिळतं. इतकंच नाही तर लस महामारीविरुद्धचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. BA.4.6 सह नवीन प्रकारांचं सध्या बारकाईने निरीक्षण केले जात आहे, कारण ते COVID महामारीच्या पुढील लाटेला कारणीभूत ठरू शकतात.