China Corona : चीनमध्ये कोरोनाने (Corona) थैमान घातलं आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की कोरोनामुळे तडफडत मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत आहेत. चीनमधले मानावाधिकार कार्यकर्ते (Human Rights Activists) जेनिफर जेंग (Jennifer Jeng) यांनी सोशल मीडियावर (Social Media) अंगावर थरकाप उडवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती उंच इमारतीच्या टेरेसवरुन खाली उडी मारत असल्याचं दिसत आहे. या तरुणाने कोरोनाच्या भीतीने टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शवागरात मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही
गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातलाय. परिस्थिती इतकी बिघडलीय की इथं अक्षरश: मृत्यूचं तांडव सुरू झालंय. एकीकडे रूग्णालयात (Hospital) पाय ठेवायला जागा नाही तर दुसरीकडे स्मशानभूमीतही (Cemetery) जागा अपुरी पडू लागलीय. शांघायच्या (Shanghai) शवागारात एका दिवसात तब्बल दहा हजारांहून अधिक मृतदेह पोहचले. या शवागाराचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. 


चीनमधील मेनलँड द पेपरच्या वृत्तानुसार नवीन संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्यानं आपात्कालीन वॉर्डमधील रूग्णांची संख्या दुप्पट झालीय. कोरोना संक्रमित 80 % रूग्णांपैकी 40 ते 50 % रूग्ण वृद्ध आहेत. हायपोक्सिमिया, छातीत जडपणा आणि श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या गंभीर रुग्णांचा देखील यात समावेश आहे.


नुकतंच शांघाय मधील एका हॉस्पिटलनं शहरातील 25 दशलक्ष लोकांपैकी निम्म्या लोकांना विषाणूची लागण होईल असा अंदाज वर्तवलाय. चीनमध्ये कोरोनाची दहशत इतकी वाढलीय की, याचाच धसका घेऊन एका तरूणानं इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली.  चीनमधील सामाजिक कार्यकर्ते जेनिफर जेंग यांनी सोशल मीडियात हा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चीनमध्ये किती भयानक परिस्थितीत ओढावलीय याची कल्पना येईल. 


हे ही वाचा : Shocking Video : जिवंत कीडा खाणं तरुणाला पडलं महाग, बघा चेहऱ्याची काय अवस्था झाली


जिनपिंग सरकारच्या (Xi Jinping government) चुकीच्या धोरणांमुळे चीनमध्ये हाहाकार माजलाय. कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवता आलं नाही तर चीनच्या चुकीची जगाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. 


रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक
गेल्या काही दिवसात चीनमध्ये नवीन संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आपत्कालीन वॉर्डमधील रुग्ण संख्या दुप्पट झाली आहे. रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. विशेष म्हणजे नव्या सब व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका वृद्धांना अधिक आहे. संक्रमित लोकांपैकी 40 ते 50 टक्के रुग्ण हे वृद्ध आहेत.