मुंबई : चीननंतर आता इराणमध्ये कोरोना व्हायरसने कहर करण्यास सुरूवात केला आहे. चीननंतर इराणमध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू कोरोनाने होत आहे. इराणने तुर्की, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आर्मिनिया यांच्या सीमा बंद केल्या आहेत. इराणमध्ये आतापर्यंत 95 केसेस आढळल्या आणि त्यातील 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये आतापर्यंत 78 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील 2700 लोकांना मृत्यू ओढवला आहे. तुम्हाला चीन आणि इराण यांच्यातील आकडे छोटे वाटत असले तरी लागण झालेल्या आणि मृत्यू झालेल्या आकड्यांची सरासरी काढली तर इराणमध्ये मृत्यूचं प्रमाण 8 टक्के जास्त आहे.


इराण आणि चीन यांच्या दरम्यान व्यापारी संबंध मोठे आहेत. जेव्हा कोरोना व्हायरसचा वेग वाढत होता, तेव्हा सर्व देश चीनशी हवाई संपर्क बंद करत होते. इराणने देखील असंच केलं. पण प्रवास बंदी केल्यानंतरही इराण आणि चीनमध्ये फ्लाईट सर्व्हिस सुरू होण्याची बातमी आली.


इराणने मागील आठवड्यात सांगितलं होतं की, कोरोनाचं संक्रमण इराणमध्ये नाही. मात्र 19 फेब्रुवारीरोजी कोम शहरातील 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. कोम इराणची राजधानी तेहरानपासून 150 किमी दूर आहे. पण तरीही हे शहर इराणमध्ये कोरोनाचं एपिसेंटर झालं आहे. 25 फेब्रुवारीरोजी या शहरातील आकडा 15 वर पोहोचला.