मुंबई : जगातील सगळ्याच देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तर या संक्रमणामुळे अनेक लोकांचे प्राण देखील गेले आहेत. या विषाणूपासून वाचण्यासाठी अनेक देश आपआपल्या परिने प्रयत्न करत आहेत. तर प्रत्येक देशातील डॉक्टर आणि संशोधक या संक्रमणाला संपवण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर हा कोरोनाचा विषाणू नक्की आला कुठून यावर ही सर्व देशांच्या वैज्ञानिकांकडून संशोधन सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये ब्रिटिश गुप्तहेर संस्थेने अशी संभाव्यता वर्तवली आहे की, कोविड -19 विषाणू हा एखाद्या चिनी प्रयोगशाळेतूनच पसरला असावा. रविवारी यावर अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर, या प्राणघातक विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात यूके लस मंत्री नाधिम जहावी यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे या प्रकरणाच्या तपासणीची मागणी केली आहे. अनेक वैज्ञानिक आणि नेत्यांनी प्रयोगशाळेतूनच हा प्राणघातक विषाणू पसरण्याची शक्यता या आधी देखील व्यक्त केली आहे.


'द सँडे टाईम्स' ने आपल्या अहवालात म्हटले की, सुरुवातीला ब्रिटनसह पाश्चात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांचे मत होते की, कोरोनाचा विषाणू चीनी प्रयोगशाळेतून बाहेर पडण्याची शक्यता फारच कमी आहे आणि त्यानंतर वटवागुळावर संशोधन केले गेले आणि त्यामध्ये आढळलेले विषाणू हे कोरोनाच्या विषाणूंशी मिळते जुळते आढळले आहे. परंतु आता याचा पुन्हा आढावा घेतल्यानंतर हा विषाणू प्रयोगशाळेतून जगात पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


पहिली केस प्रकरण सीफूड मार्केटमधून


चीनची वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी सेंन्टर हे वुहानच्या त्या सीफूड मार्केट जवळ आहे जिथे हा विषाणू 2019 मध्ये मिळाला लागला आणि त्याने साथीच्या रोगाचे रूप घेतले.


त्याचबरोबर, कोविड -19 च्या संभाव्य उत्पत्तीची सखोल चौकशी करण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन सतत जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) वर दबाव आणत आहेत. कोरोना विषाणूचे उद्दीष्ट शोधण्यासाठी डब्ल्यूएचओ संघाने चीनला परत एकदा भेट दिली पाहिजे, असे या दोन्ही देशांचे मत आहे.