लंडन : इटलीत गेल्या २४ तासात ४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्या देशातील मृतांचा आकडा ३ हजार ४०५ च्या घरात पोहोचला असून इटलीनं आता चीनला ओव्हरटेक केलंय. इटलीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ हजारावर गेला आहे. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसने अमेरिकेतही थैमान घातलं असून आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे. 


बिल गेट्स यांची मदत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापकांनी मदतीचा हात  पुढे केलाय. बिल गेट्स यांच्या गेट्स फाऊंडेशनने १०कोटी डॉलर्सच्या मदतीची घोषणा केलीय. वॉशिंग्टनच्या मदतीसाठीही ५० लाख डॉलर्स देणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.


स्वच्छतेचे आवाहन


कोरोनाचा सामना कऱण्यासाठी प्रत्येकजण स्वच्छतेचे आवाहन करताना आपल्याला दिसतोय. याचीच दखल गूगल डुडलनेही घेतलीय. हात कसे धुवावेत, किती सेकंद धुवावेत यांचा एक व्हिडिओच गूगल डुडलवर पाहायला मिळतोय. 


 अमेरिकेत २०० जणांचा बळी


कोरोना व्हायरसने अमेरिकेतही थैमान घातलं असून आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे. यामुळे अमेरिकन सरकारने लोकांना आपल्या घरी परतण्याचा किंवा परदेशात अनिश्चित काळासाठी थांबण्यास सांगितले आहे.  


कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी अमेरिकन सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. लोकांच्या प्रवासावर निर्बंध आणण्यात आले आहेत. सीमारेषाही अमेरिकेकडून बंद केल्या आहेत. सर्वसामान्य जीवनावर परिणाम झाला असून शाळा तसेच अनेक व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. लाखो लोक घरुन काम करण्याला प्राधान्य देत आहेत.