वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेच्या चिंता वाढल्या आहेत. दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एका महिन्यात रुग्णांच्या संख्येत 5 पटीने वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात एक लाखाहून अधिक रुग्ण वाढत आहेत. नव्या डेल्टा वेरिएंटमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं बोललं जात आहे. फ्लोरिडा, टेक्सास, मिसौरी, अर्कासस, लुसियाना, अलबामा आणि मिसिसिपीमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण अधिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या ही वाढू लागली आहे. जूनमध्ये 11 हजार रुग्ण उपचार घेत होते. आता मात्र ही संख्या 1,07,143 झाली आहे. कोरोनाची लस घेतली नसल्याने अनेक भागात कोरोनचा संसर्ग वाढत आहे. अमेरिकेत पहिल्यांदा नोव्हेंबर 2020 मध्ये 100,000 हून अधिक रुग्णांची वाढ झाली होती. जानेवारीमध्ये ही संख्या 2,50,000 वर पोहचली होती.


कोरोनाच्या या महामारीत आतापर्यंत 70 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्षांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांनी लस घेतली आहे. व्हाईट हाउसने शुक्रवारी ही माहिती दिली.