बिजिंग : चीनमधून जगभरात कोरोनाचा प्रसार झाला आणि पाहता पाहता साऱ्या जगानं पुढं जे काही सोसावं लागलं ते सोसलं. आता म्हणे याच चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळं हाहाकार माजल्याचं वाजावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील एका विद्यापीठामध्ये कोरोना संसर्ग हाताबाहेर गेला आहे. ज्यामुळं तेथे जवळपास 1500 हून जास्त विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.


वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार चीनमधील दलियान प्रांतातील झुंगाझे विद्यापीठात रविवारी कोरोना रुग्ण असल्याचं आढळलं. यानंतर विद्यापीठाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं. 


विद्यार्थ्यांनाही सावधगिरीचं पाऊल म्हणून हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं जिथून ते ऑनलाईन शिकवणी वर्गाला हजेरी लावत आहेत. तिथं रुममध्येच त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केल्याचं सांगण्यात येत आहे. 


चीनमध्ये सध्या कोरोनाचे कमीत कमी रुग्ण आढळले तरीही तिथं अतीसावधगिरी पाळली जात असल्याचं दिसत आहे. लॉकडाऊन करणं, विलगीकरणाचे मार्ग अवलंबणं, चाचण्यांची संख्या वाढवणं आणि प्रवासाचे नियम कठोर करणं यावर चीनमधील स्थानिक प्रशासन जोर देताना दिसत आहे. 


चीनमध्ये मागील वर्षी कोरोनाबाबतचे अनेक प्रतिबंध लावण्यात आले होते. पण, आता मात्र इथं पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ज्यामुळं येत्या दिवसागणिक चीनची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.