बिजिंग : चीनमधील वुहान प्रांतातून Coronavirus कोरोना विषाणूची सुरुवात झाली आणि पाहता पाहता संपूर्ण जगभरात या व्हायरसचं थैमान सुरु झालं. लाखोंच्या संख्येने कोरोनाची लागण झालेचले रुग्ण या विषाणूशी झुंज देत आहेत. तर, तब्बल ९० हजारहून अधिकांनी यामध्ये आपला जीव गमावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ या वर्षी डिसेंबर महिन्यात कोरोना विषाणूने चीनमधील वुहान प्रांतात हुबेई येथे हाहाकार केल्याची माहिती समोर आली. वुहान येथील  Centre for Disease Control and Prevention येथून जवळपास ६४० संशयितांच्या स्वॅब नमुन्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. ६ ऑक्टोबर २०१९ ते २१ जानेवारी २०२० दरम्यान हे नमुने घेण्यात आले होते. ज्यापैकी नऊ जणांचे नमुने कोरोना पॉझिटीव्ह असल्याची बाब उघड झाली. 


वुहान येथील सहा विविध जिल्ह्यांमधील हे नमुने या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच वुहानमध्ये कोरोना विषाणूच्या कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात सामुहिक संसर्ग होण्यास सुरुवात झाली. संशोधकांच्या निरिक्षणातून ही बाब समोर आली आहे. ज्यामुळे एका अर्थी जगभरात वुहानमध्ये कोरोनाची नेमकी सुरुवात ही फार कालावधीपूर्वीच झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. 


 


चीनमध्ये लॉकडाऊऩ शिथिल ... 


कोरोना व्हायरची दहशत पाहता मुकतंच चीनच्या वुहान प्रांतात असणारा जवळपास ७६ दिवसांचा लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून जानेवारी २३ पासून चीनमध्ये अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. सध्या लॉकडाऊनचे नियम कमी करण्यात आले असले तरीही शहरात काही निर्बंध कायम असणार आहेत.