नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान पसरलं आहे. कोरोनामुळे जगभरात जवळपास 1 लाख 70 हजारांहून अनेक मृत्यू झाले आहेत. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 24 लाख 83 हजार 86 इतकी झाली आहे. ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. एएफपीने ही आकडेवारी राष्ट्रीय अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत 42 हजार 364 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या देशातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. त्यानंतर इटलीमध्ये 24 हजार 114 जणांचा बळी गेला आहे. तर त्यानंतर स्पेनमध्ये 21,282 लोक दगावले आहेत. ब्रिटनमध्ये 16,509 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


अमेरिकासारखा बलाढ्य देशही कोरोनासमोर हतबल झाला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 2700 लोकांची मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 41 लाखांहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत न्यूयॉर्कमध्ये 15 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.


वाचा - कोरोनाशी लढा देण्यात पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर