मुंबई : कोरोनावरील (coronavirus) नवीन औषधाबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे. आता हे नवीन औषध रुग्णांना मृत्यूपासून वाचविण्यात प्रभावी ठरेल. (new drug covid antibodies) अमेरिकेतील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने आपल्या रिकव्हरी चाचणीपैकी मोनोक्लोनल अॅन्टीबॉडीजमुळे (monoclonal antibodies) हे शक्य होणार आहे. या औषधामुळे ज्यांच्यामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर अँटीबॉडीज तयार होत नाहीत, अशा रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाचणी अहवालानुसार वैज्ञानिकांनी असे कॉकटेल तयार केले आहे, ज्यामुळे कोविड अॅन्टीबॉडीज अजिबात नसलेल्या रूग्णांमध्ये मृत्यूची घटना कमी होऊ शकते. हे कॉकटेल मानवनिर्मित अॅन्टीबॉडीजसह तयार केले गेले आहे, ज्यामुळे मृत्यूच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. 'द गार्डियन'च्या अहवालानुसार ही रिकव्हरी चाचणी होती. ज्यामध्ये अनेक रुग्णांचा अभ्यासात समावेश करण्यात आला होता.


व्हायरसशी लढण्यास प्रभावी


ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या या संशोधनानुसार, शास्त्रज्ञांना आता असे तिसरे औषध सापडले आहे, ज्याच्या मदतीने रूग्णालयात रूग्ण बरे होऊ शकतात. या बरोबरच शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, हे एकमेव औषध आहे जे थेट विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी प्रभावी ठरेल. सहसा, औषधे कोविड होण्याच्या नंतरच्या टप्प्यात शरीरात होणाऱ्या inflammation शी लढतात आणि त्यावर परिणाम करतात.


मोनोक्लोनल अॅन्टीबॉडी कॉम्बिनेशनला Regeneron ने विकसित केले आहे आणि कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर अँटीबॉडीज तयार न करणाऱ्या रूग्णांवर ते प्रभावी ठरत आहे.


रिकव्हरी चाचणीचे Joint Chief Investigator सर पीटर हॉर्बी म्हणाले की, अशा परिस्थितीत आपण अँटीव्हायरल उपचार सुरू करू शकतो, हे फार महत्वाचे आहे. अशा रुग्णांचा उपचाराविना मृत्यू होतो, ज्यामध्ये अॅन्टीबॉडीज तयार होत नाहीत आणि आम्ही त्यांच्यात हा धोका कमी करू शकतो, अशा रुग्णांना वाचवू शकतो.


हे निकाल चाचणीनंतर समोर आले


हे औषध लॅब-निर्मित मोनोक्लोनल  (monoclonal antibodies) casirivimab आणि imdevimab चे कॉकटेल आहे. हे व्हायरस पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. अमेरिकेत याचा प्रयत्न केला गेला आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात ज्या लोकांना हे औषध देण्यात आले त्यांचे परिणाम चांगले आले आहेत. 


अॅन्टीबॉडीज असतील तर औषधाचा लाभ नाही!


चाचणीत अशा रुग्णांमध्ये मृत्यूची प्रकरणे 30 टक्क्यांनी कमी झाली आहेत. ज्याना कोरोना संसर्ग झाल्यानंतर अँटिबॉडीज तयार होत नव्हते, त्यांना याचा लाभ झाला. त्याचवेळी, प्रत्येक 100 रूग्णांपैकी 6 लोकांचे प्राण वाचू शकले. याशिवाय त्यांचा रुग्णातील मुक्काम हा 4 दिवसांवर कमी करण्यात मदत झाली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचविण्यात यश आले. तसेच आधीच अशा लोकांकडे अॅन्टीबॉडीज आहेत, त्यांच्यावर या औषधाचा काही परिणाम झाला नाही.