Coronavirus: कोरोनाचा पहिला रुग्ण जगात आढळला आणि त्या घटनेला आता 2 वर्षांहून अधिकचा काळ लोटला. काही राष्ट्र कोरोनातून सावरण्याच्या मार्गावर चालत असतानाच आता पुन्हा एकदा या विषाणूच्या संसर्गानं सर्वांच्या मनात दहशत वाढवली आहे. (Corona Pandemic) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनासंबंधीची सर्वात मोठी बातमी उत्तर कोरिया राष्ट्रातून येत आहे. जिथं पहिल्यांदाच अधिकृत माहितीनुसार कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. थोडक्यात जगासमोर पहिल्यांदाच उत्तर कोरियाकडून कोरोना प्रकोपाला दुजोरा देण्यात आला आहे. 


देशव्यापी लॉकडाऊनची हाक 
 उत्तर कोरियाचे शसक आणि जगभरात क्रूर शासक अशी ओळख असणाऱ्या किम जोंग उन (Kim Jong-Un) यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार प्योंगयांग (Pyongyang) प्रांतात ओमायक्रॉन (Omicrone) चा रुग्ण आढळल्यामुळं कमाल दहशत पाहायला मिळत आहे. 


देशातील इमरजेंसी रिस्पॉन्स फ्रंट (Emergency quarantine front) च्या माहितीनुसार सध्या ही देशातील आणिबाणीची परिस्थिती असल्याचं सांगत त्या अनुशंगानं पावलं उचलली जात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 


मागील दोन ते तीन वर्षांमध्ये देशात संरक्षणाचे सर्व निकष पाळले गेले, तरीही कोरोनाचा शिरकाव झालाच. दरम्यानच्या काळात आता उत्तर कोरियामध्ये आरोग्य यंत्रणा आणखी सुसज्ज करण्यावर भर देताना दिसत आहेत.