Old coins found in Kitchen : आपण असे अनेक किस्से ऐकले असतील, पाहिले असतील, वाचले असतील, ज्यामध्ये कधी शेतात किंवा कधी कुठे खोदकाम करताना कोणतं तरी असं मौल्यवान रत्न सापडलं. ते ज्याला मिळालं तो व्यक्ती मालामाल होतो. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. एका जोडप्याला त्यांच्या किचनमध्ये जुनी नाणी सापडली. सुरुवातीला या जोडप्याला हे आपल्यासोबत घडतंय यावर विश्वासच बसत नव्हता. दरम्यान, या जोडप्याने जाणकार तज्ज्ञांना ही नाणी दाखवली आणि त्यांना आनंदाचा धक्का बसला. या जोडप्याच्या किचनमध्ये काम सुरु होतं. या कामासाठी त्यांना किचनमध्ये खोदकाम करावं लागलं. जरासं खोदकाम केल्यानंतर तिथून काही शिक्के बाहेर पडायला लागले. मीडिया रिपोर्टनुसार हे शिक्के एका कपमध्ये ठेवले होते. किचनच्या फरशीच्या केवळ सहा इंच खालीच हे शिक्के होते. या खोलीत काम करणाऱ्या कारागिरांना याबाबत समजताच त्यांनी या जोडप्याला बोलावलं आणि घडला प्रसंग सांगितला होता. 


300 वर्ष जुनी नाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेंव्हा घरात खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या जोडप्याला पाचारण केलं, तेंव्हा ही नाणी पाहून जोडप्याला यावर विश्वास बसला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ही नाणी तब्बल 300 वर्ष जुनी होती. या जोडप्याने ही नाणी तज्ज्ञांना दाखवली तेंव्हा ही नाणी 1610 ते 1727 वर्षांमधील असल्याचं स्पष्ट झालं. या नाण्यांबाबत माहिती मिळताच जोडप्याने अशा गोष्टींचा लिलाव करणाऱ्या कंपनीला संपर्क साधला होता. 


सात कोटींना विकली नाणी 


या जोडप्याने जेंव्हा लिलाव करणाऱ्या कंपनीला याबाबत सांगितलं, तेंव्हा तेही हैराण झालेत. यानंतर लिलाव घडवून आणणारी मंडळी जोडप्याच्या घरी आली. त्यांनी ही नाणी पडताळून पहिली. त्यांनीच ही नाणी 300 वर्ष  जुनी असल्याचं सांगितलं. शेवटी या लिलावात ही नाणी तब्बल 7 कोटी रुपयांना विकली गेली. सध्या जगभरात या नाण्यांची आणि या लिलावाची चर्चा आहे. 


हेही वाचा : Video: सलग 12 दिवसापासून मेंढ्या धावताहेत रिंगणात! त्यांच्या कृतीने आश्चर्याचा धक्का


मीडिया रिपोर्टनुसार ही घटना अमेरिकेतील नॉर्थ यॉर्कशायरमधील एका दाम्पत्याच्या घरात घडली असल्याचं समजतं. या दांपत्याच्या घराच्या किचनमध्ये खोदकाम करताना ही नाणी आढळून आली आहेत.


 


Zee 24 Taas - LIVE TV पाहा



विश्वासार्ह मराठी बातम्या वाचण्यासाठी Zee24Taas चं मोबाईल ऍप डाउनलोड करा 


Android Link - https://bit.ly/3ECP5qG


Apple Link - https://apple.co/3E8MIKw


आमच्या सोशल मीडिया पेजेससोबतही जोडले जा : TwitterFacebookInstagramYoutube