मुंबई : असे बरेच लोक आहेत. जे सोशल मीडियासाठी कन्टेन्ट क्रिएट करतात आणि त्यांचे व्हिडीओ बनवून ते त्याच्या अकाउंटवरुन पोस्ट करतात. असं करुन बरेच लोक पैसे देखील कमावतात. परंतु सोशल मीडियावर कन्टेन्ट पोस्ट करणं एका कपलला महागात पडलं आहे. ज्यामुळे त्या तरुण आणि तरुणी दोघांनाही तरुंगात जावं लागलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की, नक्की असं काय घडलं असावं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर एका 16 वर्षीय तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ काढून शेअर केला आहे. ज्यामुळे या तरुणीला एक वर्षाची तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तिचा व्हिडीओ शूट करणाऱ्या तिच्या बॉयफ्रेंडला 3 वर्षांच्या तुरुंगवासासह 1 लाख इजिप्शियन पौंड म्हणजेच सुमारे 4.13 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.


तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडला तुरुंगवासाची शिक्षा का झाली?


याहू न्यूज ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, नॅन्सी अल-सईद नावाच्या या 16 वर्षीय तरुणीवर आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी नॅन्सीचा डान्स व्हिडीओ अश्लील असल्याचे सांगितले. यानंतर गिझा येथील बाल अपील न्यायालयाने तिला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि तिचा फोटोग्राफर बॉयफ्रेंड मोआज एम याला 1 लाख इजिप्शियन पौंड व्यतिरिक्त 3 वर्षांचा दंड ठोठावला आहे.


प्रियकराने व्हिडिओ बनवण्यास भाग पाडले?


नॅन्सी अल-सईद टिकटॉकवर खूप लोकप्रिय आहे आणि ती अनेकदा तिचे व्हिडीओ येथे शेअर करत असे, परंतु नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिच्यावर अशी वेळ आली आहे. 


इजिप्शियन अधिकार्‍यांनी सोशल मीडिया आणि इंटरनेट सामग्रीवर कारवाईचा एक भाग म्हणून नॅन्सीला अटक केली. नॅन्सीच्या बॉयफ्रेंडवर नॅन्सीला जबरदस्तीने व्हिडीओ शूट करण्यास आणि पैसे कमवण्यासाठी व्हिडीओ क्लिप शेअर करण्यास भाग पाडल्याचा आरोप लावला आहे.


तरुणी आणि तिच्या प्रियकरावर हे आरोप
इजिप्शियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नॅन्सी अल-सईद आणि तिचा प्रियकर मोआझ एम यांच्यावर अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप होता. यासोबतच त्याच्यावर समाजातील मूल्ये आणि तत्त्वांचे उल्लंघन करणे, समाजाच्या खासगी जीवनाचे पावित्र्य भंग करणे आणि इंटरनेटवर खासगी वेबसाइट आणि खाते व्यवस्थापित करणे अशा आरोपांना सामोरे जावे लागले.


प्रसिद्ध होण्यासाठी बनवला व्हिडीओ


कोर्टात सुनावणीदरम्यान नॅन्सी म्हणाली, 'मी हे केले कारण, इंटरनेटवर अनेक मुली आहेत, ज्या व्हिडीओ आणि फोटो शेअर करतात आणि त्या सर्व प्रसिद्धही आहेत. मला माहित आहे की त्या खूप पैसे देखील कमालतात. यासोबतच नॅन्सीने न्यायालयाला सांगितले की, आपल्याकडे कोणतेही काम नाही आणि अशा स्थितीत तिने हा व्हिडीओ शूट केला आहे.