Couple चा Private Video चुकून ग्रुप चॅटवर शेअर झाला क्षणात Viral आणि पुढे...
Couple Private Video : प्रेमाचे क्षण पडले महागात. रोमँटिक क्षण अश्लील म्हणून समोर आले, पाहणारे पाहतच राहिले. मग? मग एकच चर्चा आणि तोच व्हिडीओ अनेक प्लॅटफॉर्म्सवर शेअर
Couple Private Video : काही वर्षांपूर्वी कुतूहल वाटणारं, चक्क शालेय अभ्यासक्रमातून धड्याच्या रुपानं आपल्या भेटीला येणारं इंटरनेट आता आपणा सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे. घरगुती कामं म्हणू नका किंवा मग कठीणातल्या कठीण प्रश्नाचं उत्तर किंवा शंकेचं निरसन. या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक गोष्टी सहजपणे आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत. सोशल मीडियासुद्धा त्याचाच एक भाग.
समाजातील काही वर्गांना एकाच स्तरावर एकत्र आणत तिथं माहितीची देवाणघेवाण होणं हा यामागचा मुख्य हेतू होता पण, आता मात्र सोशल मीडियाचा वापर नेमका कशासाठी होत आहे हे सर्वज्ञात आहे. याच सोशल मीडियामुळं नुकतंच एका जोडप्याला आयुष्यभराची शिकवण आणि शिक्षा अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळाल्या आहेत. (Couple shot Private Video by mistaken shared it on a Group Chat latest crime news in marathi )
सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना सिंगापूरमधील एका जोडीसोबत घडली आहे. जिथं, Telegrame नावाच्या एका कम्युनिटी मेसेजिंग अॅपवर ग्रुपमध्ये शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमुळं एका जोडप्याला अश्लीलता आणि नग्नतेला दुजोरा देणारा Content शेअर केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 14 हजार पाऊंड म्हणजेच 13 लाख रुपये इतकी रक्कम त्यांनी दंड स्वरुपात देणं अपेक्षित आहे. इतकंच नव्हे तर, या शिक्षेनंतर त्यांना ग्रुपमधून बाहेरही काढण्यात आलं आहे.
x रेटेड व्हिडीओ
उपलब्ध माहितीनुसार हा एक एक्स रेटेड व्हिडीओ होता, जिथं एक महिला अश्लील कृत्य करताना दिसत होती. काहींच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीनंच हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ज्यावेळी व्हिडीओ ग्रुपमध्ये शेअर करण्यात आला आणि अनेकांनीच तो पाहिला त्यावेळी तो चुकीच्या पद्धतीनं शेअर करण्यात आला अशी सारवासारव या जोडीनं केली.
हेसुद्धा वाचा : World Most Educated Countries: जगातील सर्वाधिक साक्षर देश कोणते माहितीये?
फक्त टेलिग्रामच नव्हे, तर इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. तो एका अॅपवरून डिलीट करण्यात आला असला तरीही इतरही सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे.