मुंबई : कोरोना विषाणूचा भारतात संसर्ग वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील ही परिस्थिती पाहता न्यूझीलंडने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने भारतातून येणार्‍या प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे, ही बंदी 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी 11 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत भारतातून येणाऱ्या लोकांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले आहेत. न्यूझीलंडमध्ये 11 एप्रिल रोजी सायंकाळी 4 पासून हा नियम लागू केला जाईल.


जर न्यूझीलंडचा एखादा माणूस भारतात असेल आणि त्याला परत जायचे असेल तर त्याला या काळात प्रवेश मिळणार नाही. म्हणजेच, 28 एप्रिलनंतर भारतातून न्यूझीलंडला जाता येणार आहे. पण त्यानंतर ही बंदी वाढवली जावू शकते. जर परिस्थिती अशीच सुरु राहिली.


या वेळी भारतात कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. जगातील कोरोना रुग्णांच्या सर्वात वेगाने वाढणार्‍या देशांपैकी भारत एक देश आहे. गेल्या चार दिवसांत देशात पाच लाख नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत जवळपास अडीच लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यावरुन गांभीर्य लक्षात येऊ शकतं.


न्यूझीलंडला कोविडमुक्त घोषित करण्यात आले होते. पण नंतर पुन्हा येथे कोरोनाचे रुग्ण आढळले. येथील परिस्थिती नेहमीच नियंत्रणात राहिली. शुक्रवारी सुरू होत असलेल्या आयपीएलमध्ये न्यूझीलंडचे बरेच खेळाडू भाग घेत आहेत.