शांघाय : Shanghai airport Latest News : चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. (Covid-19 outbreak) हातपाय ससरण्यास सुरुवात केल्याने येथे कोरोनानं कहर पाहायला मिळत आहे. नव्या व्हेरियंटमुळे हाँगकाँगसह चीनमध्ये दररोज रूग्णवाढ होत आहे. त्यामुळे शांघाय एअरपोर्ट बंद करण्याची वेळ आली आहे. (Covid-19 outbreak : Shanghai scraps hundreds of inbound and outbound flights)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये कोरोनाच्या गुप्त ओमायक्रॉन व्हेरियंटने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. चीनमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रूग्णांची संख्या दररोड तब्बल 5 हजारांच्या पुढे गेली आहे. चीनच्या बऱ्याच भागात ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट अतिशय वेगानं पसरत आहे. ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी चीन प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. इथली 5 कोटी जनता घरांमध्ये कैद झाली आहे. 


चीनमध्ये गुप्त ओमायक्रॉनचा कहर 


चीनमध्ये आतापर्यंत 10 शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलाय. जगातली दुस-या क्रमांकाची सर्वात उंच इमारत शांघाय टॉवरला सील करण्यात आलं. शांघाय एअरपोर्टही बंद ठेवण्यात आलं असून हाँगकाँग, शेनजेन, जिआंग्सु, शेडोंग आणि झेजियांग प्रांतात लॉकडाऊन सारखी स्थिती आहे. 


चीनमध्ये आढळून आलेल्या ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन बीए.2 नावाने ओळखला जातो. तो प्रचंड वेगानं पसरत आहे. विशेष म्हणजे कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने बहुतांश देशांनी निर्बंध हटवले आहेत. अशातच युरोप आणि आशियात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.  



युरोपमध्ये रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ  


एका माहितीनुसार गेल्या आठवड्यात युरोपमधल्या ब्रिटन, आयर्लंड, स्वित्झर्लंड, इटली या देशांमध्ये रूग्णालयात भरती होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर काही संशोधकांनी युरोपमध्ये कोरोनाची पुढची लाट दाखल झाल्याचा दावा केला आहे. ब्रिटनमध्ये जवळजवळ 25 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


यावरून कोरोना पुन्हा एकदा वेगाने पसरतोय हेच अधोरेखित होत आहे. अर्थात त्यामुळे लगेचच घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत. शिवाय बुस्टर डोसवर भर द्यायला हवा. तरच भारतासारखा देश या तिसऱ्या लाटेतूनही तरू शकेल.