स्पेन : लॉकडाऊन शिथील केल्यानंतर स्पेनमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढलाय. त्यामुळे स्पेनमध्ये पुन्हा निर्बंध लादण्यात आलेत. आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात आलेत. स्पेनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या  ७ लाख ४ हजार २०९वर पोहोचली आहे. मृतांची संख्याही ३१ हजर ११८ वर गेली आहे. काल दिवसभरात स्पेनमध्ये कोरोनाचे १० हजार ६५३ नवे रुग्ण सापडलेत तर कोरोनामुळे ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. 


 गरज भासल्यास पुन्हा लॉकडाऊन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गरज भासल्यास लॉकडाऊन करण्यात येईल असा इशारा स्विडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी दिलाय. कोरोना विरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत स्वीडिश लोक खूपच रिलॅक्स झाले आहेत असं ते म्हणालेत. त्यामुळे कोरोनाचं प्रमाण वाढल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय नसेल असे लोफवेन म्हणालेत.


ब्राझीलकडून गुडन्यूज, डिसेंबरपर्यंत लस


कोरोनाविरोधातील लस बाबतच्या चाचणीसाठी ब्राझील सज्ज झाले आहे. डिसेंबरच्या मध्यापासून ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये सिनेव्हॅक या लसीची चाचणी केली जाणार आहे. बुटान्ट संस्थेच्या माध्यमातून हे लसीकरण होणार आहे. बहिया आणि पराना राज्यांनी रशियन स्पुटनिक-५ ही लस खरेदीसाठी करार केलाय. तर अस्ट्रॅजेनेका आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डनं विकसित केलेल्या लस याचीही इथे चाचणी होणार आहे.


मृत्यू : मेक्सिकोचा चौथा क्रमांक


मेक्सिकोत कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकडेवारीने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मृतांच्या बाबतीत मेक्सिकोचा जगात चौथा क्रमांक लागतो. मात्र चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याऐवजी सरकारने रुग्णालयांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे येथील दाट लोकवस्तीच्या भागात कोरोना वेगाने पसरला आहे. 


बार-पब, रेस्टॉरंट्स बंद करण्याचे आदेश


फ्रान्समधील पर्यटकांचे आवडीचं ठिकाण असलेल्या मार्सेलमधील बार, पब आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याचे आदेश सरकाने दिलेत. मात्र यावरुन सरकार आणि व्यवसायिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचा बार व्यवसायिकांनी कडाडून विरोध केला आहे. कोरोना संक्रमणाला बार आणि पब मालकांना दोषी ठरवलं मूर्खपणाचं असल्याचे या व्यवसायिकांचे म्हणणे आहे. 


प्रभावी अँटिबॉडिजचा शोध


कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडिजचा शोध लावल्याचा दावा जर्मनिच्या चॅरिएट हॉस्पिटल आणि DZNE या जर्मन संस्थेने केला आहे. या अँटिबॉडीज विषाणूंचा खात्मा करतात तसंच प्राण्यांमधील उतींमध्येही विषाणूंचा प्रसार रोखतात असा दावा येथील शास्त्रज्ञांनी केला आहे. हॅमस्टर या प्राण्यावर याचा यशस्वी प्रयोग केल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.