मुंबई : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार उडला आहे आणि दररोज कोट्यवधी लोक त्याच्या विळख्यात सापडले आहेत. आता कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाने (UBC) दुसर्‍या लाटेसाठी जबाबदार असणार्‍या कोरोनातील बदलांचे आण्विक फोटो प्रकाशित केला आहे. हे B.1.1.7 COVID-19 म्हणून ओळखले जाते आणि गेल्यावर्षी डिसेंबरदरम्यान ब्रिटनमध्ये हा प्रथम सापडला होता. (UBC researchers unveil first molecular images of B.1.1.7 COVID-19 mutation)


मोठ्या प्रमाणात वेगाने संक्रमण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभ्यासात असे दिसून आले आहे की कोरोनाचा हा दुसरा प्रकार पूर्वीच्या तुलनेत खूप वेगवान पसरतो आणि त्वरीत त्याचे रूप बदलतो. हेच कारण लोकांना अधिक वेगाने संक्रमित करीत आहे. विद्यापीठाच्या संशोधनात असे दिसून आले आहे की हे रूप मानवी शरीरातील पेशींमध्ये पटकन प्रवेश करते, हे देखील या फोटोत पाहिले जाऊ शकते.



म्यूटेशन धोकादायक सिद्ध


याखेरीज या नव्या प्रकारामुळे कोरोनामुळे भारत, ब्रिटन आणि कॅनडा सारख्या देशांमध्ये उद्रेक पाहायला मिळाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही गेल्यावर्षी कोरोनाच्या या प्रकाराविषयी खुलासा केला आणि म्हटले आहे की, या व्हायरसच्या आत असे अनेक म्यूटेशन झाले आहेत. ते अत्यंत धोकादायक सिद्ध होत आहेत.


संशोधकांच्या म्हणण्यानुसार B.1.1.7 रुपांमध्ये विविध प्रकारचे रुपांतर आहेत जे मानवी पेशींमध्ये प्रवेश करतात आणि त्यांना संक्रमित करतात. या व्यतिरिक्त, हा प्रकार सामान्य मायक्रोस्कोपच्या दृष्टी बाहेर आहे आणि तो केवळ क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपद्वारे ( Cryo-Electron Microscope) दिसून येतो.