वॉशिंग्टन : Covid-19 Updates: कोरोना (Coronavirus) साथीच्या आजाराच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे. जगातील अनेक देशांमध्ये संसर्गाच्या आकड्यात वाढ झाली आहे. विशेषत: अमेरिकेची (America) परिस्थिती चिंताजनक बनली आहे आणि त्यादृष्टीने ज्या लोकांना अति-जोखमीच्या ठिकाणी लसीचे दोन्ही डोस दिले आहेत, त्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. हे वृत्त सगळ्यांसाठी इशारा देणारे आहे. अनेकांना वाटले होते कोरोना निघून गेला. त्यामुळे लोक मास्क वापरत नव्हते तसेच कोरोना नियमांचे पालन करत नव्हते.


वर्षभरात डॉक्टरला तीन वेळा कोरोना, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह


Delta Variantमुळे धोका वाढला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Delta Variant of Corona - अमेरिकेत कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta Variant) नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रेचे (CDC) संचालक रोशेल वॅलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत मास्क बाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितले. ते यावेळी म्हणाले की, ही लस प्रभावी आहे, परंतु कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे पुढील संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. म्हणून मास्क घालणे आवश्यक आहे.


येथे  Infectionचे अनेक रुग्ण


रोशेल वॅलेन्स्की म्हणाले की, उच्च संसर्ग झालेल्या भागात, सीडीसी अशा लोकांसाठी शिफारस केली आहे, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी मास्क घलणे आवश्यक आहे. सीडीसीच्या आकडेवारीनुसार, दक्षिण अमेरिकेत सर्वाधिक संक्रमण झालेले आढळले आहे. तथापि, देशातील अशा भागात जसे की ईशान्य भागात, जेथे बहुतेक लसीकरण केले गेले आहे, तेथे कोरोना संक्रमणाचे प्रमाण मर्यादित आहे. अमेरिकेत, प्रति एक लाखात 100 पेक्षा जास्त संसर्ग प्रकरणे हाय रिस्क प्रकारात आहेत.


आता लोकांना मास्क घालण्याचे आवाहन 


सीडीसीच्या संशोधन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा लस घेतलेल्या लोकांना संसर्ग होतो तेव्हा त्यांचे विषाणूचे प्रमाण ज्यांना ही लस मिळाली नाही त्यांच्याइतकीच असते. सीडीसी कडून सांगण्यात आले आहे की, संशोधनानंतर असे म्हटले जाऊ शकते की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते इतर लोकांना देखील संक्रमित करु शकतात. मे महिन्यात, सीडीसीने अशा लोकांना सांगितले आहे. जरी तुम्ही कोरोनाची लस घेतली तरी तुम्ही आता मास्क घालणे आवश्यक आहे.


इतर देशांमध्येही कोरोनाचा वेग वाढला


अमेरिकेत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात अमेरिकेत कोरोनाचे 60 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत आणि आता ते पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे, जगातील इतर अनेक देशांमध्ये, संसर्गाची गती वाढली आहे, हे दर्शविते की कोरोना विषाणूमुळे पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती उद्भवू शकते.