नवी दिल्ली : जगात कोरोनाचे संकट अद्यापही कमी झाले नाही. कोरोनाबाबत चिंता वाढणे पुन्हा सुरू झाले आहे. अनेक देशांमध्ये डेल्टा वेरिएंटच्या प्रभावामुळे संसर्ग वाढताना दिसतोय. अशातच विविध देशांमधील सरकारे लसीकरणासाठी नागरिकांना वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. जेणे करून लसीकरणाचा टक्का वाढवता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाग ऑफरचा देश बनला हॉंग कॉंग
लसीकरणाला वेग देण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या आणि सरकारे चांगल्या ऑफर देत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि रशियानंतर आता हॉंग कॉंगने देखील लसीकरणावर सर्वात महाग ऑफर दिली आहे. हॉंग कॉंग सरकार लस टोचून घेणाऱ्यांना रोलेक्सची घड्याळ, टेस्लाची इलेक्ट्रिक कार, सोन्याची विट तसेच 10 कोटींचा फ्लॅट अशा ऑफर देत आहे. यासाठी लॉटरी सिस्टिम ठेवण्यात आली आहे.


लॉटरी सिस्टिमपासून दिले जातील गिफ्ट
लस टोचून गेतल्यानंतर लॉटरी सिस्टिमने विजेते घोषित केले जाणार आहेत. अनेक देशांमध्ये लसीकरणाबाबत अफवा आहेत. त्यासाठी सरकारे लसीकरणाला प्रोत्साहनदेण्यासाठी ऑफर देत आहेत. हॉंग कॉंगमध्ये आतापर्यंत 30 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे.


आयफोन, वर्ल्ड टूर सारख्या ऑफर
हॉंग कॉंग असा एकटा देश नाही. जेथे लसीकरणावर ऑफर दिली जात आहे. याआधी अमेरिकेत मोफत बीयर  आणि फ्लाइटच्या टिकिटांवर सूट देण्याची ऑफर देण्यात आली होती.
फ्रांन्स, रशिया, ब्रिटेनमधील लोकांना लसीकरणानतर iPhone आणि वर्ल्ड टूर सारख्या ऑफर दिल्या आहेत.