सिडनी : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरतोय. याचा परिणाम देशातल्या आरोग्य यंत्रणेवर झालाय. या संकटात जगातील अनेक देश भारताच्या मदतील आले आहेत. ऑस्ट्रेलियानेदेखील भारताला मदत मदतीचा हात पुढे केलाय. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कोरोनाविरोधातल्या युध्दात सर्वतोपरी मदतीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाने व्हेंटिलेटरसह आवश्यक वस्तू भारतात पाठविल्या आहेत असे त्यांनी म्हटले. ऑस्ट्रेलिया स्वत: देखील कोरोनामुळे त्रस्त आहे. तरीही भारताला मदतीचा हात पुढे केल्याने दोन्ही देशांमधील संबंध मजबूत असल्याचे दाखवते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. 'आम्ही भारतात पहात असलेली दृश्ये अत्यंत चिंताजनक आणि त्रासदायक आहेत. आम्ही भारताबद्दल सहानुभूती व्यक्त करतो आणि या संकटाच्या परिस्थितीत सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर करतो, असे ते म्हणाले.


व्हेंटिलेटरव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई), दहा लाख सर्जिकल मास्क,  500,000 P2/N95 मास्क, 100,000 सर्जिकल गाउन, 100,000 गॉगल्स, 20,000 फेस शील्ड भारतात पाठवणार आहे. ऑस्ट्रेलियाई सरकार ने 100 ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर  भारतात पाठवतील. इतर जीवनावश्यक वस्तू देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. पुढील आठवड्याच हा पुरवठा भारतात पोहोचू शकतो.



डायरेक्ट फ्लाइटवर बंदी 


त्याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने 15 मे पर्यंत दोन्ही देशांमधील थेट उड्डाणांवर बंदी घातली आहे. या व्यतिरिक्त दुबई, सिंगापूर आणि क्वालालंपूर (मलेशिया) असूनही, आता ऑस्ट्रेलियाहून भारतात पोहोचणे शक्य नसेल. भविष्यात उड्डाण सुरू होईल तेव्हा प्रवाशांना प्रवासापुर्वी निगेटीव्ह टेस्टचा रिपोर्ट द्यावा लागणार आहे.