रशिया : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid-19) काही प्रमाणात कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. काही देशांमध्ये अजूनही कोरोनाचं थैमान सुरुच आहे. रशियात (Russia) कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहिला मिळतोय. गेल्या चोवीस तासात रशियात कोरोनाचे तब्बल 40 हजार नविन रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रशिया सरकारने 11 दिवसांचा लॉकडाऊन (Lock Down) लावण्याचा निर्णय घेतला आहे. (covid19 new cases in russia 1159 fatalities in 24-hours)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत आहे असं वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. रशियात कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 40 हजार नवीन प्रकरणं समोर आली असून कोरोनामुळे एका दिवसात 1 हजार 159 मृत्यू झाले आहेत. 


रशियात शाळा, कॉलेज, मॉल, रेस्टोरंट आणि बाजारही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेस्टोरंट आणि हॉटेल केवळ ऑर्डर घेण्यासाठी सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कार्यालयीन आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. 


तसंच 60 हून अधिक वयोगटातील व्यक्तीने घराबाहेर पडू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे. केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. रशियात केवळ 32 टक्के जनतेचं लसीकरण (Corona Vaccination) झालं आहे.