Crime Viral Video : पोलिसांसोबत असलेल्या श्वानामुळे एका मोठ्या तस्करीचा पदाफार्श झाला आहे. इटलीमधील बंदरावर  तब्बल 70 टन केळी असलेले कंटेनर पोहोचले. हे कंटेनर पाहून पोलिसांचा संशय बळावला होता. पण श्वानामुळे एवढं मोठं तस्करीची घटना समोर आली आहे. गियोइया ताऊरो या बंदरावर दोन मोठे केळ्यांनी भरलेले कंटेरन पोहोचले. (Crime News dog fine banana shipment drugs cocaine italian police trending news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केळ्यांची निर्यात करणाऱ्या या कंपनीने यापूर्वी कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात केळ्यांची निर्यात केली नव्हती. एवढा मोठा साठा कुठल्या देशात पाठवण्यात येणार आहे, आणि यापूर्वी तर कुठल्याही देशाने एवढा केळ्यांचा साठा बोलवला नव्हता. पोलिसांचा संशय बळावला होता. त्यांनी कंटेनरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांसोबत जोएल नावाचा श्वानही होता. जसे पोलीस कंटेनरजवळ गेले श्वान त्यावर चढला आणि जोर जोऱ्यात भुंकू लागला. पोलिसांचा संशय आता पक्का होत होता. 


पोलिसांनी केळ्यांचे घड भरभर बाजू करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जे पाहिलं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जोएलचं मदतीने केळ्यांच्या घडांमधून कोकेनचा साठा समोर आला होता. जोएलच्या हुशारीमुळे केळ्यांमध्ये 2700 किलोचे अमली पदार्थ सापडले. पोलिसांनी अमली पदार्थ जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत याची किंमत 7200 कोटीच्या घरात आहे. (Drugs hidden under Ecuador bananas seized in Italy)


हेसुद्धा वाचा - Crime News :धक्कादायक! 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण


जोएल भुंकूला नसता तर केळ्यांसोबत असलेले अमली पदार्थांचा साठा इटलीहून जॉर्जियाला आणि तिथून पुढे अर्मेनियाला गेला असता. गियोइया ताऊरो बंदरावर मोठ्या प्रमाणात तस्करी चालते.



त्यामुळे या बंदरावर पोलिसांची करडी नजर असते. एखाद्या चित्रपटातील दृष्य वाटावं असं हे सगळं या व्हिडीओमध्ये दिसत होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2021 पासून आतापर्यंत गियोइया ताऊरो बंदरा 37 टन कोकेन पकडलं आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये केळ्यांचा साठा निर्यात करण्यात येत होता. पोलिसांनी कंटेनरचा दरवाजा उघडला आणि त्यातून केळ्यांचे बॉक्स बाहेर काढले. ते पाहून श्वान जोर जोऱ्यात भुंकायला लागला आणि त्यावर चढायला लागला. पोलिसांनी लगेचच त्या बॉक्सची तपासणी केली असता या तस्करीचा पदार्फाश झाला.