Viral News in marathi : अजब प्रेमाची गजब कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. आपण लग्नानंतर विवाह बाह्य संबंधातून पती किंवा पत्नीला सोडलं. नवरा किंवा बायको घातून प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत पळून गेले. एवढंच काय अशा अफेयरमधून मोठे मोठे हत्याकांड झाले आहेत. पण ही कहाणी खरंच जगावेगळी आहे. 


अजब लव्हस्टोरी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, एका तरुणीला ऑनलाइन एका व्यक्तीवर प्रेम झालं. एका ऑनलाइन अॅपवर या दोघांचे प्रेम बहरु लागले. संवाद सुरु झाले आणि मग भेटण्याची वेळ आली...त्यांची रोमाँटिक भेटही झाली. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 20 दिवसात या प्रेमीयुगुलाने लग्न केलं. 


महिला एक शेतकरी होती. तिचं स्वत: फार्म हाऊस होतं. लग्नानंतर ते दोघे फार्म हाऊसवर राहिला आले. तिच्या या फार्म हाऊसवर दोन पाळीव गायी होती. महिलेने लग्नाबाबत खूप स्वप्न रंगवली होती. पण त्याने त्या स्वप्नावर पाणी फेरलं. लग्नानंतर तो तिला पैशांसाठी लुबाडू लागला. (Trending News Crime News man left his wife for a cow viral news in Social media Trending now)


एकेदिवशी त्याने घरातील महागड्या वस्तू आणि त्या दोन गायी विकल्या आणि तिथून पळून गेला. महिला हे सगळं पाहून धक्काच बसला. तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याचा विरोधात तक्रार केली. तो व्यक्ती मुळा तिच्यावर प्रेम करत नव्हता. तर तो तिला फसवून तिला लूटण्यासाठी आला होता.


ऑनलाइन प्रेमाची ही गजब आणि फसवी कहाणी तिने स्वत: सोशल मीडियावर सांगितली आहे. ही धक्कादायक घटना चीनच्या एका प्रांतातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार ही महिला ऑनलाइन प्रेमाची शिकार झाली आहे. ज्या त्या व्यक्तीला कळलं ही महिला श्रीमंत आहे. तिच्याकडे दोन महागड्या गायी आहेत. हे समजल्यावर त्याने तिच्याशी लग्न केलं. 


ऑनलाइन प्रेमातून महिलांची फसवणूक झाल्याचा अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. या सोशल मीडियाच्या जगात वावरताना अशाप्रकारच्या घटन्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे.