Kailasa in UN Meeting: साध्वीच्या वेशभूषेतील ही महिला कोण? काल्पनिक देश `कैलासा`वरून चक्क भारतावर केले गंभीर आरोप
Kailasa in UN Meeting: भारतातून पळून गेलेल्या आणि बलात्कारासारखा गंभीर आरोप असलेल्या स्वघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंदाच्या (So Called Guru Nityananda) कथित कैलासा या राष्ट्रानं संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN Meeting) स्वत:चे प्रतिनिधीत्व केले असल्याचा दावा केला असून यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
Kailasa at United Nations: 'युनाइडेट स्टेट ऑफ कैलासा' (United Nations of Kailasa) नावाचा देश काढला असल्याचा दावा केलेला कथित आध्यात्मिक गुरू नित्यानंद (Controversial Criminal Nityananda) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या ट्विटर अकांऊटवरून (Nityananda Twitter Account) त्यानं एक व्हिडीओ शेअर (Video) केला आहे. ज्यात एक महिला पारंपारिक वेशात 'युनायटेड नेशन्स'मध्ये (United Nations) 'कैलासा' (Kailasa) या देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसते आहे. 'कैलासा' या देशाला अद्याप कुठलाही अधिकृत देश असल्याची मान्यता मिळालेली नसताना ही महिला तिथे UN मध्ये जाऊन नक्की 'कैलासा' देशाचे प्रतिनिधित्व कसं काय करू शकते याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (Criminal nityananda who espaced from india represents his so called country kailasa in united nations world news in marathi)
समोर आलेल्या नित्यानंदाच्या ट्विटनुसार, 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा'च्या एका महिला सदस्यानं संयुक्त राष्ट्राच्या एका मिटिंगमध्ये या कथित राष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. संयुक्त राष्ट्राची ही बैठक जेनेवा, स्विझर्लेंड (Geneva) येथे झाली आहे. यावेळी इकोनॉमिक सोशल एन्ड कल्चरल राइट्स एन्ड सस्टेनेबल डेवलपमेंट यावर या बैठकीत चर्चा झाल्याचा दावा नित्यानंदांनं केला आहे, त्यातून या बैठकीचे काही फोटोही समोर आले आहेत.
ही महिला तिथं पोहचलीच कशी? यावर सगळीकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत परंतु संयुक्त राष्ट्रच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही व्यक्तीला किंवा संस्थेला असं वाटतं आहे की मानवाधिकारांचे उल्लंघन होते आहे तर त्यावेळेला ती व्यक्ती किंवा संस्था तिथे जाऊन आपले म्हणणे मांडू शकते.
भारतावर आरोप
या बैठकीमध्ये कथित राष्ट्र 'कैलासा'तर्फे नित्यानंदाची शिष्या विजयप्रिया नित्यानंद (Vijaypriya) होती. 'कैलासा' या कथित देशाची ती स्थायी राजदूत आहे. या मिटिंगमध्ये तिनं भारतावर आरोप केले आहेत. यामध्ये तिनं म्हटलं आहे की, नित्यानंद हे हिंदू धर्माचे र्स्वोच्च गुरू आहेत आणि त्यांना भारताकडून छळ सहन करावा लागला आहे. त्यांना भारतात परत बोलावले जात नाही आहे. यापुढे तिनं असंही सांगितलं की, कैलासा येथील 20 लाख स्थलांतरित हिंदूचा छळ रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी उपाययोजना कराव्यात. तिच्या या वक्तव्यानं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. भारतावर केलेले हे आरोप अत्यंत खोटे आहेत.
कोण आहे आरोपी नित्यानंद?
नित्यानंद हा स्वघोषित आध्यात्मिक गुरू आहे. ज्याच्यावर बलात्काराच आरोप असून 2019 मध्ये त्याच्यावर खटका जारी करण्यात आला होता. त्यानंतर तो देश सोडून पळून गेला आहे. नित्यानंदाचा जन्म हा तामिळनाडूत झाला असून त्यानं 12 व्या वर्षापासून रामकृष्ण मठात आपले आध्यात्मिक शिक्षण घ्यायला सुरूवात केली होती. 1995 मध्ये त्यानं मेकॅनिकल इंजिनियरींगचे (Mechnical Enginnering) शिक्षण पुर्ण केले आहे. 2010 मध्येही त्याच्यावर अश्लीलतेच्या विरूद्ध खटला जारी झाला होता. त्याची एक सेक्स सीडी समोर आली होती. त्यानंतर त्याच्यावर अनेक खटके झाले आहेत. त्याला पोलिसांनी गजाआडही केले होते.
'युनायडेड स्टेट ऑफ कैलासा' आहे तरी काय?
'युनायडेड स्टेट ऑफ कैलासा' हा देश स्वघोषित धार्मिक गुरू नित्यानंदानं काढला असल्याचा दावा केला आहे. नित्यानंद हा एक आरोपी असून त्याच्यावर इतर अनेक आरोपही आहेत. येथे हिंदू परंपरेनुसार कथित जीवन जगलं जातं. त्यांची वेशभूषाही हिंदू परंपरेप्रमाणे असते.
कोण आहे विजयप्रिया?
संयुक्त राष्ट्रांमध्ये कथित 'कैलासा' देशाचे प्रतिनिधित्व करणारी विजयप्रिया नित्यानंद ही नित्यानंदाची शिष्या आहे. ती स्वत:ला नित्यानंदाची शिष्या समजते आणि त्याला आपल्या आयुष्याचा स्त्रोत समजते. त्यातून तिनंही या बैठकीतील आपले काही फोटो शेअर केले आहेत. तिनं जगात काही दूतावास आणि एनजीओ उघडल्याचा दावा केला आहे.