Dalai Lama Kissing Boy Viral Video : तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अकडले आहेत. काही महिन्यांपू्र्वी एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की त्यांचा उत्तराधिकारी एक महिला असू शकते पण ती आकर्षक असलाया हवी. त्यानंतर स्त्रीवादी गटांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. आता तर त्यांचा अतिशय धक्कादायक व्हिडीओने लोकांची झोप उडाली आहे. (dalai lama apologises to boy and family Dalai Lama asking minor boy to suck his tongue Viral Video courts controversy)


घृणास्पद कृत्यानंतर खळबळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमात दलाई लाला यांनी एका लहान मुलाला पहिले ओठांवर चुंबन घेतलं आणि त्यानंतर स्वत:ची जीभ बाहेर काढत त्याला "माझी जीभ चोखतोस का?," असं विचारलं. धक्कादायक म्हणजे हे सगळं सुरु असताना उपस्थित टाळ्या वाजत होते. या धक्कादायक कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. त्यानंतर त्यांचावर सर्व थरातून टीका झाली. 



अखेर त्यांनी माफी मागितली...


या वादग्रस्त व्हिडीओनंतर खुद्द दलाई लामा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी आपल्या कृत्यामुळे कोणी दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शिवाय त्यांनी लहान मुलाची आणि त्याचा पालकाची माफी मागितली आहे. दलाई लामा यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक निवदेनही टाकण्यात आलं आहे.



दलाई लामा यांचं निवदेन


या निवेदनात दलाई लामा म्हणाले की, ''सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या व्हिडीओमध्ये दलाई लामा यांना एक लहान मुलगा मिठी मारु का असं विचारतो? पण त्यांच्या या कृतीमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मुलगा, कुटुंबीय आणि जगभरातली मित्रांची दलाई लामा माफी मागू इच्छितात.''




त्यापुढे असंही सांगण्यात आलं आहे की,  ''अनेक वेळा कार्यक्रमादरम्यान आणि कॅमेऱ्यांसमोर त्यांना भेटायला आलेल्या सर्वांशीच ते निष्पापपणे आणि खेळकरपणे खोडी काढत असतात. पण या घटनेमुळे वाद निर्माण झाल्याने दलाई लामा यांनी खेद व्यक्त केला आहे.''