मुंबई : अमेरिकेच्या मिशिगन एअर शोदयम्यान जेट एअरप्लेन श्यारताना ट्रकचा जोरदार अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, तो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जेट-इंधन भरलेल्या ट्रकला आग लागल्याने अपघात झाला. शनिवारी घडलेल्या या अपघातात तुम्ही पाहू शकता की, हा ट्रक एका आगीच्या गोळ्यात जातो. ही आग इतकी भीषण आहे की, धुरांचे काळे ढग तुम्ही पाहू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या क्षणी जेव्हा हा ट्रक आगीच्या गोळ्यातून बाहेर पडतो, तेव्हा त्याला देखील आग लागलेली तुम्ही पाहू शकता आणि पुढच्याच क्षणी या ट्रकचा देखील जोरदार स्फोट होतो आणि त्या ट्रकचे तुकडे-तुकडे होतात.


न्यूयॉर्क टाईम्सच्या म्हणण्यानुसार, ट्रकचा चालक ख्रिस डार्नेल आणि त्याच्या कुटुंबातील एक सदस्य जो अनेक वर्षांपासून एअर शोचा व्यवसाय कररतात, त्यांचा या घटनेमुळे मृत्यू झाला आहे.



बॅटल क्रीक फील्ड येथे फील्ड ऑफ फ्लाइट एअर शो दरम्यान एक 40 वर्षीय माणूस दोन विमानांमधून रेसिंग करत असताना त्याचा शॉकवेव्ह जेट ट्रक क्रॅश झाला. दोन प्रॉप प्लेन हवेत उडत होते आणि धावपट्टीजवळ ट्रकवर धावत असताना ट्रकला आग लागली.


ख्रिस डार्नेलचे वडील नील डार्नेल यांनी फेसबुकवर दिलेल्या निवेदनात जेट ट्रकमधील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.


त्यात या कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक, बार्बरा हॅलुस्का यांनी सांगितले की, "अनेक व्हिडीओंमध्ये पाहिल्याप्रमाणे, आगीचा गोळा केवळ एक भ्रम होता आणि श्री डार्नेल या आगीतून गेलेच नाहीत. धावपट्टीवर ट्रक धावत असताना गवताला आग लागल्याचे दिसले. गर्दीच्या बाजूने ट्रक आगीतून जात असल्याचे दिसत होते. पण प्रत्यक्षात तसे नव्हते."