मुंबई : कधी कधी जास्त पैसे आणि श्रीमंती देखील एखाद्याच्या मृत्यूचं कारण बनू शकतं. हो हे खरं आहे. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, एखाद्याची श्रीमंती कशी त्याच्या मृत्यूचं कारण बनू शकते. पैसे आले की, लोकांचं आयुष्य सुखकर होतं. खरंतर हे प्रकरण परदेशातील आहे. जेथे एका 22 वर्षीय मुलाचा डोक्याला हेलिकॉप्टरचा पंखा लागला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर परदेशात सुट्टीसाठी गेलेल्या या तरुणाने हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना सेल्फी काढायला घेतली. त्या तरुणाने अती उत्साहाता हेलिकॉप्टरचा पंखा बंद होण्याआधीच सेल्फी घेण्यासाठी गेला, ज्यानंतर या तरुणाच्या डोक्याला पंखा लागला आणि त्याचं डोकं, त्याच्या धडापासून वेगळं झालं.


जॅक फेंटन नावाचा हा मुलगा ब्रिटनमधील एका उच्चभ्रू कुटुंबातील होता. तो आपल्या तीन मित्रांसह हेलिकॉप्टरने मायकोनोस येथून ग्रीक राजधानी अथेन्सजवळील खासगी हेलिपॅडवर पोहोचला होता. येथे बेल 407 हेलिकॉप्टर इंजिन थांबण्यापूर्वी खाली उतरले. तो हेलिकॉप्टरच्या मागे पोहोचला, तिथे त्याचा अपघात झाला.


अपघातानंतर तात्काळ आपत्कालीन सेवांना पाचारण करण्यात आले मात्र पंख्याचा वेग जास्त असल्याने जॅकचा तत्काळ मृत्यू झाला. आता अपघाताचे कारण शोधले जात आहे. या प्रकरणात, जर पायलटने प्रवाशाला इंजिन आणि पंखा बंद करण्यापूर्वी खाली उतरण्यास सांगितले असेल, तर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.


अथेन्स-आधारित ओपन टीव्हीने सांगितले की, अपघाताच्या वेळी जॅक फोनवर बोलत होता किंवा सेल्फी घेत होता. जॅकचे आई-वडील मायकोनोसहून दुसऱ्या हेलिकॉप्टरने अथेन्सला पोहोचले होते. सर्व सुट्ट्या संपवून ते येथून ब्रिटनला परतत होते. जॅकच्या मृत्यूच्या तपासात तो हेलिकॉप्टरमधून का उतरला यावर लक्ष केंद्रित केले जाईल.


आता विचार करा की, या तरुणाकडे इतके पैसे नसते इतकी श्रीमंती नसती, तर त्याने हेलिकॉप्टरमधून कधीच प्रवास केला नसता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झालाच नसता.